कर्जत: वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करून निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांच्या चापडगाव येथील बैठकीत करण्यात आला. (Latest Ahilyanagar News)
जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य आणि चापडगाव गटप्रमुख पोपट थोरात यांनी केले होते. जिल्हा सल्लागार प्रा. दादा समुद्र यांच्या अध्यक्षस्थानी होते. कर्जत तालुका अध्यक्ष पोपट शेटे, युवा तालुका अध्यक्ष बुवासाहेब (पप्पू) चव्हाण, कर्जत शहराध्यक्ष राहुल दादा पोळ आदी उपस्थित होते.
पुढील बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेषतः मिरजगाव गटामध्ये युवा तालुका अध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी इच्छुक उमेदवार म्हणून तयारी दर्शवली आहे. चापडगाव गटप्रमुख म्हणून पोपट थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
राहुल अडसूळ, रवी सोनवणे, बबन जाधव, रामचंद्र खंडागळे, बाळू थोरात, नितीन सोनवणे, भूषण टिळक, किरण शिंदे, सिद्धार्थ सोनवणे, संजय कांबळे, मनोहर सोडवणे, दिलीप सरोदे, संदीप साळवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. चापडगाव शाखाध्यक्ष अक्षय सोनवणे यांनी आभार मानले.