Sant Narhari Maharaj Pranpratishtha Pudhari
अहिल्यानगर

Sant Narhari Maharaj Pranpratishtha: तिसगावात श्री संत नरहरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात

महादेव मंदिरात तीन दिवस भक्तिरस; पश्चिम भागातील पहिला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

पुढारी वृत्तसेवा

करंजी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महादेव मंदिरामध्ये श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त तीन दिवस तिसगाव येथील महादेव मंदिरात महापूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच गावातून मूर्तीची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तीन दिवस अक्षरशा तिसगाव भक्तिरसात न्हाऊन गेले होते.

गावातील प्रत्येक चौकात घरासमोर महिलांनी सडा रांगोळी काढत या मिरवणुकीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले. या मिरवणुकीत बालगोपाळांसह वारकरी टाळकरी महिला पुरुष मंडळी देखील मोठ्या उत्साहाने पाऊल आणि फुगडी खेळत पंढरीच्या पांडुरंगाचा आणि नरहरी महाराजांचा जयघोष केल्याने संपूर्ण तिसगाव परिसर दणाणून गेला.

बुधवारी महादेव मंदिरात तयार करण्यात आलेल्या आकर्षक सिंहासनावर मंत्रोच्चारामध्ये बेद्रे परिवारासह इतर विवाहित जोडप्यांच्या उपस्थितीत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. साडेतीन फूट उंचीची ही आकर्षक मूर्ती जयपूर येथून सुवर्णकार समाज बांधवांनी आणली आहे.

याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, संजय पाटील लवांडे, सरपंच इलियास शेख, माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे, अरुणदेवा पुंड, विक्रम ससाने, सुनील पुंड, सुनील लवांडे, पोपटराव आंधळे, भारत गारुडकर, सुनील शिंगवी, डॉ. काशिनाथ ससाणे, चेअरमन धीरज मैड, सुनील परदेशी, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, उपाध्यक्ष महेश लवांडे, नंदकुमार लोखंडे, मन्सूर पठाण, दिलीप गांधी, शंकरराव उंडाळे, गणेश गंगे, संतोष छाजेड, राजू नाईक यांच्यासह सराफ सुवर्णकार समाजाचे प्रमोद बेद्रे, सदाशिव मैड, भगवान टाक, वैभव बेद्रे,राजू पंडित, आबासाहेब बोऱ्हाडे, अमोल चिंतामणी, राजू म्हस्के, भरत चिंतामणी, वैभव डहाळे, गिरीधर डहाळे, योगेश मैड, दीपक डहाळे, अमोल ससाने, तसेच सुवर्णकार समाज यावेळी उपस्थित होते.

पश्चिम भागातील पहिली मूर्ती

तिसगावच्या सुवर्णपेढीची आर्थिक उलाढाल देखील मोठी आहे. सर्व सुवर्णकार समाज बांधवांनी एकत्रित श्रीसंत नरहरी महाराजांची जयपूर येथून आकर्षक मूर्ती आणली आणि तिसगाव बाजार तळातील महादेव मंदिरामध्ये सिंहासनावर या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करत नरहरी महाराजांचा पश्चिम भागातील पहिला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्याचे सुवर्णकार प्रमोद बेद्रे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT