मुळा धरण दहा हजारी पार; 24 तासांत 709 दलघफू पाण्याची आवक Pudhari
अहिल्यानगर

Rahuri: मुळा धरण दहा हजारी पार; 24 तासांत 709 दलघफू पाण्याची आवक

पावसाचा वर्षाव कमी झाल्यानंतर आवकेत घट

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: मुळा धरणाच्या पाणीसाठ्याने अखेर 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. जून महिन्यातच धरणात समाधानकारक पाणी साठा जमा झाला आहे. यंदाची मान्सून कृपा सुरू राहिल्यास लवकरच धरण पूर्ण भरेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागलेली आहे.

जिल्ह्यामध्ये दक्षिणेची तहाण भागविणार्‍या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर मान्सून कृपा झाली. कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड पटट्यामध्ये जोरदार वृष्टी झाल्याने धरणाकडे विक्रमी 21 हजार क्यूसेक प्रवाहाची आवक झाली. त्यानंतर पावसाचा वर्षाव कमी झाल्यानंतर आवकेत घट दिसून आली. (Latest Ahilyanagar News)

दि. 19 जून (गुरूवारी) सायंकाळी धरणाकडे 10 हजार क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक सुरू होती. दि. 20 जून (शुक्रवारी) सायंकाळी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये केवळ 2 हजार 247 क्यूसेक प्रवाहाने नविन पाणी जमा होत होते. पाण्याची आवक घटली तरीही गुरूवारी झालेल्या मोठ्या आवकेची पाणी शुक्रवारी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये जमा झाले. एकाच दिवसामध्ये मुळा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये 709 दलघफू वाढ दिसून आली.

धरणात 1371 दलघफू पाणी आवक

मुळा धरणाला मान्सून हंगामात एकूण 1 हजार 371 दलघफू नविन पाणी प्राप्त झाले आहे. मुळा धरण साठा मान्सून हंगामापूर्वी 8 हजार 832 दलघफू इतका होता. दि. 18 जून (बुधवारी) रोजी मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाचा धो धो वर्षाव झाला. त्यामुळे धरणाकडे इतिहासात पहिल्यांदा जून महिन्यात 21 हजार क्यूसेक प्रवाहाने मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा झाल्याचे दिसले.

धरणात 40 टक्के पाणीसाठा

काल दि.20 जून रोजी सायंकाळी मुळा धरणाच्या पाणी साठ्याची नोंद 10 हजार 203 दलघफू नोंदविण्यात आली. मुळा धरणामध्ये 40 टक्के पाणीसाठा जमा असून त्यापैकी 5 हजार 703 दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. 26 हजार दलघफू पाणी क्षमता असलेल्या मुळा धरणात मागिल वर्षापेक्षा चालू वर्षी तब्बल 4 टिएमसीने पाणीसाठा अधिक आहे.

मागिल 5 वर्षातील आजच्या तारखेचा पाणी साठा

जून 2020 - 6775 दलघफू

जून 2021- 8175 दलघफू

जून 2022 - 8456 दलघफू

जून 2023 - 9247 दलघफू

जून 2024 - 6061 दलघफू

जून 2025 - 10203 दलघफू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT