

श्रीरामपूर: गोंधवणी येथे सासू सुनेचे वाद झाले. नवर्याने आईची बाजू घेतल्याचा राग येऊन बायकोने नवर्याच्या अंगावर खिडकीतून उकळते तेल टाकून जखमी केले.
गोंधवणी येथील जाधव वस्ती येथे राहणारे अनिल चंद्रभान वाघमारे यांच्या पत्नी प्रतिभा व आई कौसल्या यांचे घरगुती कारणावरून वाद झाले. यात अनिलच्या पत्नीने त्याच्या आईला शिवीगाळ केली. (Latest Ahilyanagar News)
तेव्हा अनिल याने पत्नीला विचारले की, आईला तू घाण घाण शिव्या का दिल्या? याचा राग येऊन पत्नी प्रतिभा हिने तिचा नवरा अनिल वाघमारे हा बेसावध असताना अचानक उकळते तेल अंगावर फेकून त्यास जखमी केले. त्यानंतर पत्नी प्रतिभा माहेरी निघून गेली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अनिल चंद्रभान वाघमारे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पत्नी प्रतिभा वाघमारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.