ग्रामसभा  pudhari
अहिल्यानगर

Shrirampur News: अविश्वास ठराव दाखल झाला...सभाही सुरु झाली...पण 15 मिनिटांत आदेश प्राप्त अन् अविश्वासाची सभा तहकूब

Sarpanch Avishwas Tharav : मुठेवडगाव सरपंचांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Shrirampur Sarpanch Avishwas Tharav

श्रीरामपूर : तालुक्यातील मुठेवाडगांव ग्रामपंचायत सरपंच सागर मुठे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. 6 विरूध्द 2 सदस्य अशा बलाबल असतानाच, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवार दि.13 मे रोजी ठिक 11.30 वाजता बैठक सुरू असताना अवघ्या 15 मिनीटात सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश प्राप्त झाल्याने तहसीलदारांना सभा तहकूब करावी लागली.

मुठेवाडगांव ग्रामपंचायतचे सरपंच मुठे यांच्याविरूध्द विरोधकांनी गुरूवार दि.8 मे रोजी अविश्वास ठराव तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडे दाखल केला. दुसर्‍या दिवशी सकाळी सरपंचाना 13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिलदार यांचे उपस्थितीत अविश्वास ठराव बैठक असल्याचे पत्र मिळाले. (Ahilyanagar News Update)

मुठेवाडगांव ग्रामपंचायतीमध्ये पावणे पाच वर्षांपूर्वी 9 सदस्य जागेसाठी निवडणूक होऊन, त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत विखे-मुरकुटे गटाचे 4 सदस्य, तर कानडे - ससाणे गटाचे 5 सदस्य निवडून आले. ओबीसी पुरूष जागेवर सागर मुठे सरपंचपदी विराजमान झाले. सरपंच पद भुषविल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच अतिक्रमण मुद्द्यावर एकमेकांचे सदस्य पात्र अपात्रतेचा सिलसिला सुरू झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक उपायुक्त, स़ंभाजीनगर उच्च न्यायालयापासून सुप्रीम कोर्ट दिल्लीपर्यंत लढाई सरपंच सागर मुठे यांना लढावी लागली.

सत्ताधारी सरपंच गटाचे दोन सदस्य अपात्र होऊन त्या जागेच्या पोटनिवडणुकीत विखे-मुरकुटे गटाचे दोन सदस्य निवडून येऊन सदस्य संख्या सहा झाली. सरपंच अविश्वास ठराव संमत करण्यासाठी सात सदस्याची गरज होती. किंवा सत्ताधारी गटाच्या तीनपैकी एक अपात्र करणे हा पर्याय ह़ोता. एक सदस्य निर्मला कैलास पाचपिंड अतिक्रमणमध्ये कुठेच सापडल्या नाहीत. म्हणून सरपंच सागर मुठे व उपसरपंच विजया भोडंगे यांना अतिक्रमणमध्ये घेरण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी सरपंचांना पात्र ठरविले. मात्र उपसरपंच भोंंडगे यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाने अपात्र ठरविले. या निकालाविरूद्ध भोंडगे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता सदस्य संख्या 6 विरूध 2 झाल्याने अविश्वास ठराव संमत होईल म्हणून विरोधक विखे-मुरकुटे गटाने आखणी केली.

काल मंगळवार दि.13 रोजी पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ठिक 11.30 वाजता बैठक सुरू झाली. बैठकीस संगिता शंकर मुठे (विखे गट), लंकाबाई दिनकर मुठे (विखे गट), अनिल रमेश मुठे, किशोर विश्वास साठे, भाऊसाहेब जयवंत मुठे, लताबाई शिवाजी मुठे हे चौघे (मुरकुटे गट) असे सहा सदस्य तर सत्ताधारी गटाचे सरपंच सागर ज्ञानदेव मुठे व निर्मला कैलास पाचपिंड हे दोघे उपस्थिती होते. तहसिलदार यांनी वेळेत सभेचे कामकाज सुरू केले प्रोसिंडिग पुर्ण ह़ोत असतानाच ठीक 11.45 वाजता सुप्रीम न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याचा अ‍ॅड. कैलास औताडे यांचा मोबाईल संदेश तहसिलदार यांना मिळाला. यावरून तहसिलदार वाघ यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले. या केसेसमध्ये अ‍ॅड. अजित काळे, अ‍ॅड. कैलास औताडे, अ‍ॅड. मनोज दौंड, अ‍ॅड. अरूण जंजीरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अविश्वास ठराव बारगळल्यानंतर सत्ताधारी गटाने फटाके वाजवून स्वागत केल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT