गरिबांना घर देणे ही खरी माणुसकी: डॉ. सुजय विखे पाटील Pudhari
अहिल्यानगर

Housing for Poor: गरिबांना घर देणे ही खरी माणुसकी: डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर येथे लाभार्थ्यांना सातबारा उतार्‍यांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

Sujay Vikhe Patil says giving homes to poor is true humanity

नगर: शिर्डी परिसरातील सावळीविहिर बुद्रूक येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणं हेच खरे माणुसकीचं काम असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

सावळीविहीर बु. अतिक्रमिक ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य प्लॉटचा हस्तांतरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्लॉटच्या उतार्‍याचे वितरण देखील करण्यात आले. (Latest Ahilyanagar News)

यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, सरपंच उमेश जपे, आप्पासाहेब जपे, बाळासाहेब जपे, विकास जपे, शांताराम जपे, रावसाहेब देशमुख, राजू जपे, रूपाली आगलावे तसेच शासकीय अधिकारी व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. विखे पाटील म्हणाले, हा कार्यक्रम एक दिवसात झाला नाही.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, विरोधकांच्या टीका सहन करत, आपण केवळ आश्वासन न देता कृती केली. जात, धर्म, पक्ष न पाहता फक्त गरज पाहून हे वाटप केले गेले. ही आमच्या कार्यपद्धतीची ओळख असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले. सोमया फॅक्टरी येथील जमीन 400 कुटुंबांना घरकुलसाठी जागा मिळावी यासाठी सोमय्या शेठ यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच ते प्रश्न मार्गी लावून संबंधितांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. विखे पाटील यांनी पुढील टप्प्यांबाबतही घोषणा केली. या नव्या वसाहतीत अंगणवाडी, समाजमंदिर आणि मोफत लग्न सभागृह उभारण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत वाळू ग्रामपंचायतीमार्फत दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारी प्रवृत्ती सहन करणार नाही

शिर्डीमध्ये कायदा-सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही. गावातील प्रत्येक महिला-मुलगी रात्रीही सुरक्षिततेची पूर्ण खात्री घेऊन वावरू शकेल, असा समाज आम्हाला निर्माण करायचा असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT