Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: समता पतसंस्था घोटाळा: 60 कोटी प्रकरणात 6 महिलांच्या खात्यांची एसआयटीकडून फेरतपासणी

57 खात्यांची चौकशी सुरू असताना 5 कोटी व्यवहार असलेल्या सहा खात्यांवर लक्ष; मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावर ईडीही तपासात

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या 57 खातेधारकांची पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच आता त्यातील सहा खात्यांची एसआयटी फेरतपासणी करणार असल्याचे सूत्रांकडून समजले. महिलांच्या नावे असलेल्या या सहा खात्यांतून 5 कोटींचे व्यवहार झाल्याचे पुढे आले आहे.

‌‘समता पतसंस्थेच्या‌’ राहाता शाखेत खरात नॉमिनी असलेली 57 लोकांची खाती समोर आली. या खात्यातून सुमारे 60 कोटींचे व्यवहार झाले आहेत. यातील 50 खातेधारकांची शिर्डी पोलिसांनी जबाब नोंदविले. यातील सर्वांनीच कागदपत्रे खरी असल्याचे सांगून सही आणि व्यवहाराशी संबंध नसल्याचे जबाब दिले आहेत. उर्वरित 7 खातेधारकांची चौकशी आठवडाभरात पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान यात सहा महिलांची खाते असून त्यात 5 कोटीचे व्यवहार झाले आहेत. सहा महिलांची ही खाते तपासणीचा निर्णय एसआयटीने घेतला आहे. शिर्डी पोलिसांनीही एसआयटीला आवश्यक ती कागदपत्रे व माहिती पुरविल्याचे समजते.

खरातच्या पोलिस कोठडीमुळे शिर्डी पोलिसांकडून आर्थिक व्यवहाराची चौकशी काहीसी मंदावली होती. मात्र आता खरात पुन्हा नाशिक कारागृहात गेल्याने तपासासोबतच दोषारोपपत्र तयारीला वेग आला आहे.

आर्थिक व्यवहाराला मनी लॉड्रिंगची किनार

भोंदू अशोक खरातने समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतून 60 कोटीचे आर्थिक व्यवहार केले आहेत. यातील 43 खाते ही एकाच दिवसात उघडण्यात आल्याची माहितीही समोर आली. खरात हा भक्तांकडून रोखीने पैसे घेत होता. ते पैसे याच खात्यातून त्याने वापरात आणल्याचा संशय आहे. एकंदरीत खरातच्या व्यवहाराला मनी लॉड्रिंगची किनार असल्याचा संशय असून त्यादृष्टीने ईडीने चौकशी सुरू केल्याचे समजते. दरम्यान, भोंदू खरातचा ताबा ईडीला 18 मे रोजी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT