Drugs Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Drug Case: श्रीरामपूरमध्ये मेफेंटर्मिन विक्री प्रकरण उघड; दोघे रंगेहात अटकेत

55 बाटल्या जप्त; नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषध विक्रीवर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये पुन्हा नशेचे मेफेंटर्मिन औषध विक्री करणाऱ्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. दोघांकडून पोलिसांनी अदका मेफेंटरर्मिन औषधाच्या एकुण 20 हजार 520 रुपये किंमतीच्या 55 बॉटल जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अथर्व रणजीत पाटील कडून 1 हजार 569 रुपये किमतीच्या मेफेंटर्मिन सल्फेट इंजेक्शनच्या एकुण 5 बॉटल्स तर, गिरीश सुनिल मुंदडा याच्याकडून 18 हजार 950 रुपयांच्या मेफेंटर्मिन सल्फेट इंजेक्शनच्या 50 बाटल्या असा एकूण 20 हजार 519 रुपयांच्या 55 बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अथर्व रणजीत पाटील व गिरीश सुनिल मुंदडा या दोघांविरुद्ध भादवि 2023 चे कलम 123,125,278 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दोघांना तत्काळ अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, अमोल गायकवाड, अजित पटारे, सागर बनसोडे, रामेश्वर तारडे, रविंद्र शिंदे, चालक सहाय्यक फौजदार राजेश सुर्यवंशी व बाळासाहेब गिरी यांनी यशस्वी केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव करीत आहे.

गुप्त माहिती मिळाली अन्‌‍..!

शहरातील वार्ड नं. 7 थत्ते ग्रांऊड परीसरात दोन इसम नशेसाठी वापरली जाणारी गुंगीकारक मेफेंटर्मिन औषधाच्या बॉटलची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगू आहेत, अशी गुप्त माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. तत्काळ पोलिस पथकाने थत्ते ग्रांउड परीसरामध्ये सापळा लावला असता, अथर्व रणजीत पाटील, (रा. पटेल हायस्कुलमागे, ॲमेझॉन ऑफीसमोर, वार्ड नं. 7), गिरीश सुनिल मुंदडा, (रा. साई सहवास अपार्टमेंट, वार्ड नं. 7) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT