Accident Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Chavan family accident: चव्हाण कुटुंबाचा पाचवा बळी गेला; 9 दिवसांनंतर जखमी महिलेचा मृत्यू

श्रीरामपूरहून गणपती दर्शनाला जाताना ट्रक-कार धडक; चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर, दोन लहान मुले उपचाराधीन

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर : स्विफ्ट कारमधून खंडाळ्याच्या गणपती दर्शनाला जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात श्रीरामपुरातील चव्हाण कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. तर, नऊ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमी महिलेचाही काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील बळींची संख्या 5 वर जाऊन पोहचली आहे.

श्रीरामपूर शहरातील चव्हाण कुटुंब त्यांच्या स्विफ्ट कारमधून खंडाळ्याच्या गणपती दर्शनाला जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात श्रीरामपूर शहरातील संतोषी वडापावचे संचालक अशोक चव्हाण व रमेश चव्हाण यांच्या कुटुंबातील प्रशांत रमेश चव्हाण, सिद्धार्थ सुनील चव्हाण, ऐश्वर्या अशोक चव्हाण हे जागीच ठार झाले होते.

तर संगीता अनिल चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील जखमी सारिका अनिल चव्हाण (वय 30) यांच्यावर नऊ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र काल त्यांचाही मृत्यू झाला. रुद्र अशोक चव्हाण (वय 6), ऋत्वी अशोक चव्हाण ( वय साडेतीन) या दोन लहान मुलांवर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT