श्रीरामपूर: गोंधवणी रोडवरील दत्त मंदिराजवळ दोन गटामध्ये झालेल्या वादात लाकडी दांड्याने मारहाण करुन रस्त्याच्या कडेचे दगड उचलून दगडफेक केली. तसेच शोअरलेट कंपनीची कार रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या गोण्यांना जाऊन धडकली. त्यातून झालेल्या वादात कार जाळली.
या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तेजस मोरे याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अरबाज अन्वर शेख, मोहसीन मुश्ताक शेख, अरबाज रफीक देशमुख यांना अटक केली आहे.
तसेच दुसऱ्या घटनेत मोहसीन मुश्ताक शेख व त्याचा आहेद शेख व मोहसीनचा मुलगा गब्बू हे दोघेजण मोहसीन यांच्याकडील कार घेऊन फेरफटका मारण्यासाठी गेले असता, एज्युकेशन शाळेच्या समोर, दत्त मंदिर जवळ गोंधवणी रोड सिमेंटच्या गोण्यास गाडीचा धक्का लागुन गाडीचा बंपर तुटल्याने कार ही रोडच्या मधोमध थांबल्याने तेथे असलेले तेजस मोरे, अनिकेत डफळ, राजू चव्हाण व इतर १५ ते २० लोकांनी मनुष्याचा मृत्यू होवू शकतो, याची जाणीव असतांना देखील गाडीवर दगडफेक केली.
तसेच मोहसीन व त्यांचे नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करुन मारहाण केल्याने त्यात मोहसीनचा भाऊ अल्तमश अश्पाक शेख जखमी झाला. तसेच मोहसीनची कार स्फोटक पदार्थाद्वारे जाळून टाकली. या प्रकरणी मोहसीन शेख याने दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीकांत पोपट गावडे, अनिकेत रविंद्र डफळ, तेजस राजु मोरे, साहिल दत्तात्रय पाटेकर, राज जवाहर चव्हाण यांना अटक केलेली आहे.