श्रीगोंदा : क्षुल्लक कारणााच्या वादातून कोकणगाव येथील भाऊसाहेब रजपूत (वय 43) यांच्यावर शुक्रवारी रात्रीा चाकूहल्ला करण्यात आला. पुणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सूत्राच्या माहितीनुसार भाऊसाहेब राजपूत आढळगाव येथील महेश चव्हाण या व्यक्तीशी शुक्रवारी दुपारी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. शुक्रवारी रात्री उशिरा दोघांत पुन्हा जोरदार वादावादी व हाणामारी झाली. त्यात भाऊसाहेब राजपूत यांच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजपूत यांना श्रीगोंदे शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वादाचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित महेश चव्हाण हा आढळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या गुन्ह्यात महिलेसह इतर पाच ते सहा जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
कोकणगाव येथील घटनेबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. फिर्याद दाखल करण्यासाठी मृताची पत्नी पोलिस ठाण्यात आल्या आहेत.किरणकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक