Shiv Sena Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Shiv Sena: शिवसेनेच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाप्रमुख पदासाठी १२ जणांची दावेदारी; शिर्डीत जोरदार लॉबिंग

पक्ष निरीक्षकांकडून इच्छुकांच्या मुलाखती; जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये पदासाठी चुरस

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर/ पोहेगाव: महायुती सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेतील संघटनात्मक पदांसाठी इच्छुकांमधून जोरदार लाँबिंग सुरू आहे. शिर्डी येथे पक्ष निरीक्षकांकडून दोन दिवस इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या, त्या वेळी समर्थकांसह इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केल्याचेही दिसले. शिवसेनेच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाप्रमुख पदावर तब्बल 12 शिवसैनिकांनी दावा केला आहे.

दरम्यान, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेल्या जुन्या आणि ‘नंतर’ आलेल्या नव्या शिवसैनिकांमध्ये ‘रेस’ लागल्याचे पहायला मिळाले. शिर्डी येथे शिवसेना संपर्कप्रमुख खा.ज्योती वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व राम रेपाळे आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

यावेळी सहा विधानसभा मदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवून, संघटनात्मक काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाखतीमध्ये इच्छुकांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्षाप्रती असलेली निष्ठा, काम करण्याची क्षमता आणि संघटना वाढीसाठी असलेली तळमळ याची सविस्तर माहिती जाणून घेतल्याचे समजले. मुलाखतीनंतर इच्छुकांनी दावेदारी सांगितल्याचे दिसले.

तालुकाप्रमुखांसह गट-गणप्रमुखासाठीही लॉबिंग!

शिवसेना, महिला आघाडी व युवासेना या तिन्ही संघटनांमधील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद गटप्रमुख व पंचायत समिती गणप्रमुख या विविध पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधनासभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती दिसली. विशेषतः युवासेनेच्या पदांसाठी तरुणांचा प्रतिसाद लक्षवेधी ठरला.

स्पर्धेतील नावे!

मारुती मेंगाळ, राजेंद्र देवकर, अभिजित पोटे, रवींद्र मोरे, भगवान गंगावणे, विजय काळे, विजय जगताप, नितीन औताडे, बाळासाहेब पवार, मुकुंद शिनगर, आकाश बेग आणि कमलाकर कोते यांनी मुलाखती दिल्याचे समजले. ही जबाबदारी एखाद्या बड्या नेत्याच्या जवळच्या समर्थकाला, नातेवाईकाला की, निष्ठावंताला दिली जाते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT