साईबाबा संस्थान Pudhari File Photo
अहिल्यानगर

Shirdi Saibaba Temple: देणगीदारांवर सुविधांची बरसात, 50 लाखांपेक्षा अधिक दान देणाऱ्यांना काय मिळणार?

Shirdi Saibaba Temple : दर्शन, आरतीसह बहुमानाबाबत नवीन नियमावलीला संस्थानाच्या तदर्थ समितीची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

Shirdi Saibaba Temple

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच तदर्थ समितीची मान्यता मिळाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.

या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थानामार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा- विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्हणून शाल व फोटो, साईचरित्र, उदी-लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादी दिले जाणार आहे. या धोरणामुळे साईभक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा संस्थानाचा प्रयत्न आहे, असे गाडिलकर यांनी सांगितले.

देणगीदारांना साई संस्थानच्या नव्या सेवा-सुविधा...

  • दहा हजार ते 24 हजार 999 रुपयांपर्यंतचे दान : साईभक्तास एका वेळी कुटुंबातील 5 सदस्यांसाठी आरती पास, 5 उदी प्रसाद पाकिटे, एक लाडू प्रसाद पाकीट

  • 25 हजार 50 हजार रुपयांपर्यंतचे दान : साईभक्तास दान करतेवेळी दोन वेळा कुटुंबातील 5 सदस्यांसाठी आरती/दर्शन पास दिला जाईल. तसेच, एक 3-डी पॉकेट फोटो, 5 उदी प्रसाद पाकिटे, साई सत्चरित्र पुस्तक, 2 लाडू प्रसाद पाकिटे.

  • 50 हजार ते 99 हजार 999 रुपयांपर्यंतचे दान : - साईभक्तास दान करते वेळी कुटुंबातील 5 सदस्यांसाठी दोन व्हीव्हीआयपी आरती पास, एक 3-डी पॉकेट फोटो, 5 उदी प्रसाद पाकिटे, एक साई सत्चरित्र पुस्तक, 2 लाडू प्रसाद पाकिटे.

एक लाख रुपये ते 9 लाख 99 हजार 999 रुपयांपर्यंतचे दान : साईभक्तास त्यांनी दान केलेल्या वर्षामध्ये 2 व्हीव्हीआयपी आरती पास मिळतील. नंतरच्या वर्षामध्ये त्यांनी केलेल्या दानाप्रमाणे प्रतिवर्ष एक व्हीव्हीआयपी आरती पास मिळेल. (उदाहरणार्थ, पाच लाख रुपयांच्या दानासाठी, पहिल्या वर्षी 2 व्हीव्हीआयपी पास, नंतरच्या चार वर्षांसाठी प्रत्येक वर्षी 1 व्हीव्हीआयपी पास मिळेल). त्यांना गेट नं. 6 किंवा त्या वेळी कार्यरत असलेल्या सशुल्क दर्शनरांगेतून कुटुंबाच्या 5 सदस्यांसाठी तहहयात वर्षातून एकदा मोफत दर्शन सुविधा. तसेच, साईभक्तास देणगी दिल्यानंतर एक वेळा बहुमान म्हणून, एक सन्मान शाल, एक 3-डी डेस्क नोट होल्डर/ 3-डी आयशेप फोटो, एक 3-डी पॉकेट फोटो, अभिषेक/सत्यनारायण पूजेचे कूपन, 5 उदी प्रसाद पाकिटे, 1 साई सत्चरित्र पुस्तक, 3 लाडू प्रसाद पाकिटे आणि कुटुंबातील 5 सदस्यांसाठी मोफत व्हीआयपी प्रसाद भोजन पास.

दहा लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत दान : साईभक्तास त्यांनी देणगी दिलेल्या प्रमाणात प्रत्येक वर्षी 2 व्हीव्हीआयपी आरती पास मिळतील. (उदाहरणार्थ, 30 लाख रुपयांच्या दानासाठी, 30 वर्षांसाठी प्रतिवर्ष 2 व्हीव्हीआयपी पास मिळतील). या देणगीदार साईभक्ताच्या कुटुंबातील 5 सदस्यांना तहहयात वर्षातून एक वेळा मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल. साईभक्तास वर्षात एक वेळा श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी दिली जाईल. (उदा. प्रत्येक रु. 10 लाख दानासाठी एका वेळा वस्त्र परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी मिळेल (उदाहरणार्थ, 30 लाख रुपयांच्या दानासाठी देणगीदारास 3 वर्षे वस्त्रे देण्याची संधी मिळेल). देणगीदार साईभक्तास दान करतेवळी एक वेळेस श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र भेट म्हणून दिले जाईल. देणगीदार साईभक्तांस दान करतेवेळी बहुमान म्हणून एक सन्मान शाल, एक श्री साईंची मूर्ती, 3-डी डेस्क नोट होल्डर/ 3 डी आय शेप फोटो, 3 डी पॉकेट फोटो, अभिषेक/सत्यनारायण पूजेचे कूपन, 5 उदी पाकिटे, 1 साई सत्चरित्र पुस्तक, 5 लाडू प्रसाद पाकिटे, कुटुंबातील 5 सदस्यांसाठी मोफत व्हीआयपी प्रसाद भोजन पास.

50 लाख आणि त्याहून अधिकचे दान : देणगीदार साईभक्तास तहहयात 5 सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रतिवर्षी 3 व्हीव्हीआयपी आरती पास. श्री साईबाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी दिली जाईल, (उदा. प्रत्येक रु.10 लाखाच्या दानासाठी एक वस्त्र देण्याची संधी मिळेल ) ही वस्त्र देणगीदार साईभक्त आयुष्यभरात कधीही दान करू शकतात. त्याकरिता 1 महिना आधी कळविणे बंधनकारक राहील. देणगीदार साईभक्तास दान करतेवेळी श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र (1 सेट) भेट म्हणून दिले जाईल.

देणगीदार साईभक्तासह कुटुंबातील 5 सदस्यांना तहहयात प्रत्येक वर्षी 2 प्रोटोकॉल व्हीव्हीआयपी दर्शन पास मिळतील. साईभक्तास बहुमान म्हणून, 1 सन्मान शाल, 1 श्री साईंची मूर्ती, 3 डी डेस्क नोट होल्डर / 3 डी आय शेप फोटो, 3 डी पॉकेट फोटो, अभिषेक/सत्यनारायण पूजेचे कूपन, 5 उदी पाकिटे, 1 साई सत्चरित्र पुस्तक, 5 लाडू प्रसाद पाकिटे, देणगीदार साईभक्ताच्या कुटुंबातील 5 सदस्यांना मोफत व्हीआयपी प्रसाद भोजन पास मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT