Shirdi Sai Baba Pudhari
अहिल्यानगर

Shirdi Sai Baba: शिर्डीत साईभक्ताची अनोखी भेट! २७ लाखांची सोनेरी शिळा साईचरणी अर्पण

अडीच टन वजनाच्या संगमरवरी शिळेवर साईबाबांची ११ वचने कोरली; भक्ताने साईचरणी केली अनमोल भेट अर्पण

पुढारी वृत्तसेवा

नगर: सोन्याच्या कोटींगमध्ये साईबाबांची 11 वचने कोरलेली संगमरवरी शिळा एका साईभक्ताने नुकतीच साई चरणी अर्पण केली. या शिळेचे वजन अडीच टन इतके असून, या अनमोल भेटीचे किंमत 27 लाख रुपये आहे.

शिर्डीच्या साई समाधी दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येतात. अनेकांकडून मौल्यवान भेटवस्तू अर्पण केल्या जातात. मात्र, नुकतेच एका भक्ताने साईबाबांची 11 वचने कोरलेली सोनेरी कोटींगची 27 लाखांची आकर्षक शिळा साई चरणी अर्पण केली. साईबाबांची शिकवण भक्तांपर्यंत पोहचावी, ही या मागची भावना असल्याचे सांगितले जाते.

राजस्थानातून संगमरवरी तीन शिळा मागविण्यात आल्या. प्रत्येक शिळेचे वजन हे सुमारे अडीच टन आहे. साईबाबांची 11 वचने आकर्षक पद्धतीने त्यात कोरण्यात आली आहेत. आकर्षक शिलाकल्प, सुंदर रंगसंगती आणि सोन्याच्या कोटींगमुळे ही शिळा कौतुकाचा विषय बनली आहे.

या शिळांची किंमत 27 लाख रुपये असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

दरम्यान, साईबाबांची ही वचने हिंदी आणि मराठी भाषेत कोरली असून, राज्यासह हिंदी भाषिक भाविकही या शिळेसमोर थांबून साईबाबांची शिकवण घेऊन जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT