Ashok Kharat Case Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: शिर्डी फसवणूक प्रकरण; अशोक खरातला न्यायालयीन कोठडी, नाशिक कारागृहात रवानगी

जमीन व्यवहार व सावकारी प्रकरणात अटक; तपास अपुरा असल्याने न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नगर: शिर्डीतील फसवणूक व सावकारकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर भोंदू अशोक खरातला पुन्हा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक व सावकारीच्या गुन्ह्यात शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातला अटक केली होती. त्याच्या पाच दिवसाच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्याने त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.

या गुन्ह्यात कल्पना खरात हिला अटक करणे बाकी असून काही साक्षीदार निष्पन्न होवून त्यांची चौकशी बाकी आहे. जमीन खरेदी व्यवहारात आयकर भरला की नाही याची चौकशी करणे बाकी आहे.

खरात अपेक्षित चौकशीस सहकार्य करत नसल्याने आणखी चौकशीसाठी त्याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करावी, अशी मागणी तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी केली. कर भरण्याच्या तपासणी करणे पोलिसांच्या अखत्यारीत नसून ते आयकर विभाग चौकशी करेल.

त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद खरातच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT