संगमनेर बाजार समिती pudhari
अहिल्यानगर

Market Committee : संगमनेर बाजार समिती नाशिक विभागात दुसरी

अहिल्यानगर जिल्ह्यामधून सलग दुसर्‍यांदा प्रथम क्रमांक

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर : शासनाच्या पणन विभागाच्या वतीने स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक, तर नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीष गुंजाळ यांनी दिली.

संगमनेर बाजार समिती शेतकर्‍यांसाठी वरदान ठरली आहे. येथे शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर बाजार समिती वरचढ ठरली आहे. संगमनेर सह आसपासच्या तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राज्यातील 305 बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रमाणित केली.

यात प्रपत्र व सहाय्यक निबंधक यांनी तपासणी करून निकषानुसार गुणांकन केले आहे. यामध्ये 2023 - 24 साठी महाराष्ट्रातून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने हे यश मिळवले आहे.

बाजार समितीच्या वाटचालीत सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, मनीष गोपाळे, अरुण वाघ, विजय सातपुते, सुधाकर ताजणे, सखाराम शेरमाळे, अनिल घुगे, नीलेश कडलग, संजय खरात, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे, दिपाली वरपे, रुक्मिणी साकुरे, सचिव सतीश गुंजाळ सर्व अधिकारी कर्मचारी आदिंनी सातत्यपूर्ण काम केले आहे.

बाजार समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माजीमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, बाजीराव पा.खेमनर, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, आदींसह सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राज्यातील 305 बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारीत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला नाशिक विभागातून दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर अहिल्या नगर जिल्ह्यातून सलग दुसर्‍यांदा पहिला क्रमांक मिळाला आहे.
शंकरराव खेमनर, सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT