वाळू तस्करांवर छापा  pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar: नांदगाव हद्दीतील नदीपात्रात छापा

चार डंपर जप्त; आठ जणांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नगर : के. के. रेंजच्या परिसरात नांदगाव हद्दीतील नदी पात्रात वाळू उपसा व वाहतूक करणार्‍या वाळू तस्करांवर एसपींच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत 4 ढंपर, 8 ब्रास वाळू तसेच 9 मोटार सायकल असा सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत के.के.रेंज नांदगाव गावाचे शिवारातील कापरी नदीत सादिक शेख व शुभम पुंड दोघे रा.नांदगाव हे त्यांचे कडील जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा करुन ढंपरमध्ये भरुन चोरुन वाहतूक करत असल्याची खबर पोलिस उपाधिक्षक संतोष खाडे यांना मिळाली होती. त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक सोबत घेत त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी नदीपात्रात काही इसम जेसीबीच्या सहाय्याने बाळू उपसा करुन उपासलेली वाळू दुसर्‍या एका ठिकाणी ढंपरमध्ये भरुन वाहतूक करताना दिसले. पथकाची चाहूल लागताच वाळू तस्कर वाहनासह पळून जाऊ लागले. त्यांचा पोलिस पथकाने पाठलाग करुन 4 ढंपर व 19 मोटार सायकल पकडल्या. तसेच अभिषेक संजय

साळवे वय-22 वर्षे रा.शिंगवे नाईक ता.जि.अहिल्यानगर अशा एक ढंपर चालकास ताब्यात घेण्यात आले. प्रमोद जाधव रा.नांदगाव (फरार) याचे ढंपरवर तो चालक असल्याचे सांगितले. तसेच अन्य ढंपर बाबत विचारपूस केली असता त्याचे मालक व चालक गणेश माळी (फरार), अकिल शेख (फरार), काशिनाथ माळी, सुनिल माळी (फरार), शुभम पुंड (फरार) रा.नांदगाव ता.जि.अहिल्यानगर असे असल्याचे पुढे आले. ढंपरमध्ये बाळू भरण्यासाठी असलेला जेसीबी हा सादिक शेख रा.नांदगाव ता.जि.अहिल्यानगर (फरार) याचा असल्याचे सांगितले.

या कारवाईत एकूण 61,10,000 असा एकूण किंमतीचे 4 ढंपर, 8 ब्रास वाळू तसेच 9 मोटार सायकल असा मुद्देमाल मिळून आला. एमआयडीसी पोलिसांत आठ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जून बनकर, अजय साठे, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे,अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT