कर्जत: रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) वतीने कर्जत पंचायत समितीसमोर सलग नव्या दिवशी आंदोलन सुरू होते. पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश भैलुमे यांच्यासोबत गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, उप अभियंता कोकरे, प्रशासन अधिकारी प्रताप गांगर्डे, विस्तार अधिकारी परमेश्वर सुद्रिक, एकनाथ आंधळे यांनी चर्चा केली. मात्र, या चर्चेमधून आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले.
या चर्चेच्या वेळी भाजप समन्वयक प्रवीण घुले, शब्बीर पठाण, अनिल समुद,. बाळासाहेब कांबळे, राजेंद्र घोडके, भीमराव साळवे, .दादा कांबळे, सागर कांबळे, हौसराव मोरे, अरुण नेवसे, छगन समुद्र, उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
यावेळी मागासवर्गीयांच्या वस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात यावी. तालुक्यातील 92 पैकी 80 गावामध्ये महापुरुषांची नावे दिल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.तसेच 15 टक्के अनुशेषाचे आकडेवाडीसमोर आली आहे. मात्र, 5 टक्के दिव्यांगांची यादी मिळाली नाही. नवबौद्धांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी 78 कोटी 46 लाख रुपये खर्च झाला असून, त्या कामाबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, म्हणून आंदोलन सुरू ठेवण्यात आल्याची माहिती अंकुश भैलुमे यांनी दिली.