राहुरी: दारुचे लायसन्स काढण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपए घेऊन यावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या बाबत सासरच्या लोकांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुजा गायकवाड यांचा विवाह दि. 4 मे 2017 रोजी बोरी फाटा वांजुळपोई, ता. राहुरी येथे सागर काळु गायकवाड, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपुर याचे सोबत झाला होता. लग्नानंतर तीन महिने सासरकडील लोकांनी पुजाला चांगले नांदविले. त्यानंतर पुजा यांचा पती नेहमी रात्री अपरात्री फोनवर बोलत असत म्हणून, पुजा यांनी पतीला ऐवढा वेळ कोणासोबत बोलता, असे विचारले. (Latest Ahilyanagar News)
त्याने उडवा उडवीचे उत्तरे देवुन शिवीगाळ केली. परंतु पतीचे फोनवर बोलणे जास्तच वाढल्याने पुजा यांनी पतीचा मोबाईल चेक करण्यासाठी माघीतला असता, पतीने मोबाईल चेक करण्यासाठी दिला नाही, त्यामुळे पतीचे बाहेर कोणा सोबत प्रेमसंबध आहेत, असा तिला संशय आला. पती दारु पिऊन आला व शिवीगाळ करुन मारहाण केली. तुला इथे नांदवयाचे असेल तर तु मला कशाला विरोध करायचा नाही.
तसेच पुजाची सासू देखील शिवीगाळ करुन घालुन पाडुन बोलत असे. तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असे. त्यानंतर तुला येथे नांदवयाचे असेल तर तू तुझे आई वडीलांकडुन दारुचे लायसन्स काढण्यासाठी दोन लाख रुपये घेवुन ये, असे म्हणून शिवीगाळ करू लागले.
तू जो पर्यंत पैसे आणत नाही, तो पर्यंत आम्ही तुला येथे नांदवणार नाही असे म्हणून पुजा यांना उपाशी पोटी घरातुन काढुन दिले. सासरच्या त्रासाला कंटाळून पुजा सागर गायकवाड यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून पती सागर काळु गायकवाड, सासू मंगल काळु गायकवाड, दोघे रा. महाराणा प्रताप कॉलनी, शिरसगाव, ता. श्रीरामपुर यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.