राहुरी : लग्नाचे अमिष दाखवत राहुरी परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी राहुरी पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सतीश तोडकर (रा.आष्टी,बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून तरुणीला त्रास देत होता. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे म्हणून तो तिचा पाठलाग करत असे. पीडितेने वारंवार नकार देऊनही त्याने फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते. 25 मार्च 2026 ला दुपारी महेश तोडकर दुचाकीवरून राहुरी बसस्थानक परिसरात आला.
तिथे तरुणीला दमदाटी केली आणि लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेले. बळजबरीने अत्याचार करत तिला धमकी दिली. तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत महेश तोडकर विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 87, 78 (1), 351 (2), 351 (3) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पोक्सो 2012 च्या कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.