श्रीरामपूरः शहरा शेजारील शिरसगाव हद्दीतील भोंगळ व शेलार वस्ती परिसरात पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशातून तब्बल 35 वर्षानंतर नगरपालिकेच्या थत्ते मैदान येथील पाण्याच्या टाकीपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली.
याकामी माजी नगरसेविका स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी प्रयत्न केले आहे. परिसराला शहर हद्दीतून जोडणारे रस्ते व पाण्याच्या पाइपलाईनद्वारे पाणी देवून, कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी केतन खोरे व स्नेहल खोरे यांनी पुढाकार घेतला. (Latest Ahilyanagar News)
मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवादनगर ते शेलार वस्ती रस्त्याचे खडीकरण पूर्ण करण्यात आले आहे. थत्ते मैदान पाणी टाकी ते शिरसगाव हद्दीत पाण्याची पाईपलाईन टाकली आहे.
शिरसगाव ग्रामपंचायतीने गणेश मुदगुले व संदीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण हद्दीत लाईन जोडणी केली. यामुळे तब्बल 35 वर्षानंतर पिण्याचे पाणी पाईपलाईनद्वारे आले. कायमस्वरूपी रस्त्यासह पाण्याची समस्या सुटल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.