अत्याचारप्रकरणी तरुणासह लॉजमालकाला अटक(File Photo)
अहिल्यानगर
Rahuri Crime: अत्याचारप्रकरणी तरुणासह लॉजमालकाला अटक
या घटनेतील 17 वर्षीय कॉलेज तरुणीची पाच महिन्यांपूर्वी आरोपी यश डौले याच्याशी समाजमाध्यमावर ओळख झाली होती.
राहुरी: समाजमाध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करून पसार झालेल्या तरुणाला आणि त्यांना लॉजमधील रूम भाड्याने देणार्या लॉज मालकाला राहुरी पोलिसांनी जेरबंद केले. (Latest Ahilyanagar News)
या घटनेतील 17 वर्षीय कॉलेज तरुणीची पाच महिन्यांपूर्वी आरोपी यश डौले याच्याशी समाजमाध्यमावर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि त्यांच्यात मैत्री झाली. 28 जुलै 2025 रोजी दुपारी त्या कॉलेज तरुणीला आरोपीने शनिशिंगणापूर रोडवरील उंबरे शिवारात हॉटेल राधाकृष्णमधील एका रूममध्ये नेले. तेथे आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा विनयभंग केला. तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डौले (रा. जोगेश्वर आखाडा, ता. राहुरी) याच्यावर पोस्कोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

