करंजी : गेल्या पाच वर्षांत राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामध्ये रस्ते, वीज, पाणी या प्रश्नांना प्राधान्यक्रम दिला. गळती लागलेल्या पाझर तलावांची दुरुस्ती केली. अनेक बंधार्यातील गाळ काढला. त्यामुळेच आज दुरुस्त पाझर तलाव, बंधारे तुडुंब भरले. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद हीच माझ्या केलेल्या कामाची पावती आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.(Latest Ahilyanagar News)
वैजूबाभळगाव, भोसे, डमाळवाडी या भागातील नुकसानणग्रस्त भागाचा माजी आमदार तनपुरे यांनी रविवारी पाहणी दौरा केला. यावेळी पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील पाझर तलावाचे जलपूजन तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या तलावाची गळती थांबावी यासाठी 29 लाख रुपयांचा निधी आपण दिला होता. त्यामुळे या तलावातून होणारी गळती पूर्णपणे थांबून तलाव आज तुडुंब भरला आहे. याचा फायदा पंचक्रोशीतील सर्व शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. दुरुस्ती होण्याअगोदर एका महिन्यात तलाव गळतीमुळे कोरडाठाक व्हायचा. आता मात्र, उन्हाळ्यात देखील शेतकर्यांना पाणीटंचाई भासणार नाही.
यावेळी सरपंच राजेंद्र पाठक, सरपंच अंबादास डमाळे, युवानेते अशोक टेमकर, सरपंच शिवनारायण ससे, प्रतीक घोरपडे, उपसरपंच मनेश घोरपडे, सोपान गुंजाळ, भरत घोरपडे, सुधाकर गुंजाळ,
विशाल गुंजाळ, साईनाथ गुंजाळ, दिनेश आठरे मेजर, माजी उपसरपंच देवीदास आमले यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.