जो हिंदूंसाठी काम करील तोच देशावर राज्य करील: डॉ. सुजय विखे पाटील  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar: जो हिंदूंसाठी काम करील तोच देशावर राज्य करील: डॉ. सुजय विखे पाटील

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये शक्तिप्रदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नगर: आमदार संग्राम जगताप हे जरी या सभेस उपस्थित नसले तरी समोर बसलेला प्रत्येक जण संग्राम जगताप आहे. कारण संग्राम जगताप ही एका व्यक्ती नसून एक विचार आहे. प्रत्येक संकटात माझ्या मागे उभा असतो त्या मित्राला जाहीर समर्थन देण्यासाठी मी आलो आहे. पुढील काळात जो हिंदूंसाठी काम करील तोच देशावर राज्य करील, हा संदेश या सभेद्वारे पूर्ण महाराष्ट्रात मी देत आहे, अशी भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी रविवारी येथे मांडली.

आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या समर्थनार्थ रविवारी सकल हिंदू समाजातर्फे शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यासाठी माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या जाहीर सभेत डॉ. सुजय विखे बोलत होते. (Latest Ahilyanagar News)

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, हभप संग्राम भांडारे महाराज, श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग व राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचे अविनाश तायडे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या मासिक श्राद्ध विधीमुळे आ.संग्राम जगताप सभेस उपस्थित नव्हते.

डॉ. विखे म्हणाले, की आ. संग्राम जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आता मीही हळूहळू जात आहे. आज जे जगताप यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, त्यांना शिव्या देत आहेत कारण त्यांच्यामुळे आज हिंदू जागा झाला आहे, याचा त्रास आता त्यांना होऊ लागला आहे.

हिंदूंच्या महिला, जमिनी आता सुरक्षित होत आहेत. लोकसभा निवडणुकीतील व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी विधानसभा निवडणुकीतून दिले आहे. याचाही त्रास त्यांना होत आहे. ते धर्मनिरपेक्षतेची भाषा करतात. आम्हीही धर्मनिरपेक्ष होण्यास तयार आहोत. त्याआधी तुम्ही गोहत्या बंद करा, लव्ह जिहाद बंद करा, आमच्या मंदिरांवर ताबा मारणे बंद करा.

भांडारे महाराज म्हणाले, की जसा अयोध्येतील राममंदिराचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला, तसाच ज्या मंदिरांवर त्यांनी ताबा मारला, त्यांचाही निकाल लागणार आहे. त्यांनी समजून घ्यावे, आता देशात व राज्यात हिंदूंच्या विचाराचे सरकार आहे.

हिंदूंच्या विरोधातील षडयंत्र सहन केले जाणार नाही. आ.संग्राम जगताप यांच्यासारखे प्रखर हिंदुत्ववादी आमदार मिळाल्याचा अभिमान बाळगत त्यांचे हात बळकट करा, असे आवाहन केले. यावेळी अविनाश तायडे, अशोक गायकवाड, संजय मरकड, बजरंग मोरे महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT