Share Trading Scam Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Share Trading Fraud: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 91 लाखांची फसवणूक; एक अटक, दोघे फरार

17 टक्के व्याज व सहा महिन्यांत रक्कम दुप्पट देण्याचे आश्वासन; सरपंचासह आठ जणांची लाखोंची गुंतवणूक अडकली

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली 17 टक्क्यांपर्यंत व्याजदर आणि सहा महिन्यांत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 91 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अनिल आबासाहेब बंड (रा. कोरडगाव, पाथर्डी) याला अटक केली असून श्रेयस जयराम गरड (रा. बालमटाकळी ता. शेवगाव) व पुतण्या रोहित दादासाहेब बंड हे दोघे पसार झाले. नंदकिशोर शिवाजी वारंगुळे (रा. तोंडोळी, पाथर्डी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तेे शेतकरी असून तोंडोळीचे सरपंच आहेत.

ओळखीच्या अनिल बंड यांनी सरपंच वारंगुळे यांना 1 जानेवारी 2024 रोजी कोरडगाव येथील घरी बोलावले. तेथे बंडचा भाचा श्रेयस जयराम गरड (रा. बालमटाकळी ता. शेवगाव) व पुतण्या रोहित दादासाहेब बंड (रा.कोरडगाव) यांची ओळख करून दिली. या दोघांनी शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसायाची माहिती दिली. बोधेगाव (ता. शेवगाव) येथे शौर्य ट्रेडर्स आणि कोरडगाव येथे शिवराज ट्रेडर्स या नावाने कार्यालये सुरू केल्याचे सांगून गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन दिले.

सहा महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचा शब्द देत वारंगुळे यांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून वारंगुळे यांनी 16 जानेवारी 2024 रोजी बोधेगाव येथील कार्यालयात 24 लाख 50 हजार रुपये रोख स्वरूपात गुंतवले. काही दिवसांनी पैशांची गरज भासल्याने त्यांनी रक्कम परत मागितली असता आरोपींनी 5 लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित 19 लाख 50 हजार रुपये वारंवार मागूनही परत केले नाहीत. दरम्यान रोहित बंड व श्रेयस गरड हे गाव सोडून निघून गेले. त्यानंतर अनिल बंडही बेपत्ता झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वारंगुळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आणखी आठ जणांना गंडा

बद्रीनारायण आबासाहेब मुखेकर (रा.कोरडगाव) 26 लाख, विजय बाळासाहेब मुखेकर (रा.कोरडगाव) 28 लाख, शिवाजी भानुदास पोपळे (रा. मुंगी,शेवगाव) 5 लाख, पोपट भाऊसाहेब जाधव (रा.हातगाव,शेवगाव) 2 लाख, योगेश चितळे (रा.चितळवाडी,पाथर्डी) 1 लाख 50 हजार, सोमनाथ कारभारी घनवट (रा.नजिक बाभुळगाव,शेवगाव) 5 लाख, योगेश गहिणीनाथ घनवट (रा.नजिक बाभुळगाव,शेवगाव) 2 लाख, भिमराज भाऊसाहेब पवार (रा.हातगाव,शेवगाव) 2 लाख.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT