पारनेरमध्ये कही खुशी, कही गम Pudhari File Photo
अहिल्यानगर

Parner News: पारनेरमध्ये कही खुशी, कही गम...; तालुक्यातील 114 सरपंचपदांची आरक्षण सोडत

114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी बुधवारी (दि. 23) तहसीलदार गायत्री सौंदाणे व नायब तहसीलदार दीपक कारखिले व यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले. सन 2025 ले 2030 या कालावधीकरिता हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाने कही खुशी, कही गम, असे वातावरण तालुक्यात निर्माण झाले आहे. अनुसूचित जाती 6, अनुसूचित जमातीसाठी 8, नागरिकांचा मागास प्रवर्ग 31 व सर्वसाधारण प्रवर्गसाठी 69 अशा 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले.

  • गावनिहाय आरक्षण ः अनुसूचीत जाती महिला ः पिंपळनेर, माळकुप, रांजणगाव मशिद, जामगाव,किन्ही. -अनुसूचित जमाती महिला ः गुणोरे, भाळवणी, वडगाव आमली, म्हसणे, म्हसे खुर्द.

  • अनुसूचित जमाती ः निघोज, लोणीहवेली, म्हस्केवाडी, राळेगण थेरपाळ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ः बाबुडी, भोंद्रे, गारगुंडी, गारखिंडी, जाधववाडी, जातेगाव, जवळा, कारेगाव, कुरुंद, पाडळी रांजणगाव, पळशी, राळेगणसिद्धी, यादववाडी, पाबळ, काळकूप.

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग ः खडकवाडी, चोंभूत, पळवे बुद्रुक, पठारवाडी, पुणेवाडी, रायतळे, वाघुंडे खुर्द, विरोली, वनकुटे, सुपा, वाडेगव्हाण, पळवे खुर्द, वडुले, शेरी कासारे, गटेवाडी.

  • सर्वसाधारण महिला ः वडनेर हवेली, मांडवे खुर्द, रांधे, घाणेगाव, मुंगशी, पिंप्री जलसेन, कासारे, पाडळी दर्या, पिंप्री गवळी, कडुस, म्हसोबा झाप, अक्कलवाडी, चिंचोली, वाघुंडे बुद्रुक, वेसदरे, काकणेवाडी, रुईछत्रपती, ढोकी, सारोळा आडवाई, वडझिरे, शहांजापूर. वडनेर बुद्रुक, डिकसळ, वडगाव सावताळ, पानोली, वारणवाडी, रेनवडी, पिंप्री पठार, काताळवेढा, कळस, तिखोल, दैठणे गुंजाळ, हिवरे कोरडा.

  • सर्वसाधारण ः हंगा, अपधूप, देवीभोयरे, शिरापूर, टाकळी ढोकेश्वर,अळकुटी, बाभूळवाडे, भांडगाव, दरोडी, भोयरेगांगर्डा, देसवडे, ढवळपुरी, धोत्रे बुद्रुक, गांजीभोयरे, गोरेगाव, हत्तलखिंडी, कान्हूरपठार, करंदी, कर्जुलेहर्या, कोहोकडी, लोणीमावळा, मावळेवाडी, नांदूरपठार, नारायणगव्हाण, पाडळी कान्हूर, पळसपूर, पिंपळगाव रोठा, पिंपळगावतुर्क, पोखरी, सांगवीसूर्या, सावरगाव, सिद्धेश्वरवाडी, वडगाव दर्या, वाळवणे, वासुंदे, पाडळी आळे.आरक्षण सोडत स्वराज राजेंद्र नरसाळे याच्या हस्ते करण्यात आली.

अनेकांचा झाला हिरमोड

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या भाळवणी, निघोज येथे अनुसूचित जमातींसाठी राखीव, तर रांजणगाव मशीद जामगाव या अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा किरमोड झाला. राळेगणसिद्धी, सुपा, वनकुटे, वाडेगव्हाण, जवळा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव, तर कान्हूर पठार टाकळी ढोकेश्वर येथे सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT