Tribal Ashram School Assault: आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचा विनयभंग

चार जणाविरोधात ‘पोक्सो’नुसार गुन्हे दाखल, शिक्षक गजाआड; मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिपाई पसार
Ahilyanagar
प्रातिनिधिक छायाचित्र file photo
Published on
Updated on

अकोले: आदिवासी भागातील एका शासकीय आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, शिक्षकासह त्याला मदत करणार्‍या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि शिपायाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोस्को) अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिक्षकाला पोलिसांनी गजाआड केले असुन मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि शिपायाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Ahilyanagar Latest News)

एका अल्पवयीन पीडित मुलीने अकोले पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून होस्टेलवर सन 2023 मध्ये राहण्यास आले. त्या वेळी आठवीच्या वर्गात होते. त्या वेळी आमचे शाळेतील शिक्षक धुपेकर सर (पूर्ण नाव माहित नाही) लेक्चर संपल्यानंतर आमच्या वर्गात यायचे व सतत माझ्यासोबत व माझ्या इतर मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे. मी आठवीच्या वर्गात असताना एके दिवशी जेवणाची सुटी झाली तेव्हा धुपेकर सर वर्गात आले. मी व माझ्या मैत्रिणी बेंचवर बसलेले असताना सरांनी विचारले, की काय करत आहेस?

Ahilyanagar
Ahilyanagar News: ‘लेटलतीफ, दांडी बहादर’ रडारवर!

त्यांच्याशी बोलणे टाळण्याकरिता मी दुसर्‍या बेंचवर जाण्यासाठी उभी राहिले असता सरांनी मागून माझी मांडी पकडली व माझी मैत्रीण (वय 17) वर्षे हिच्या छातीवरून हात फिरवला. दुसर्‍या मुलीस बोलले की माझी पाठ खाजवून दे व हात पाय दाबून दे. त्यानंतर मी व माझ्या इतर मैत्रिणी मिळून मुख्याध्यापिका कुलथे मॅडम यांच्याकडे गेलो व घडलेला प्रकार त्यांना सांगितला. मात्र त्या वेळी कुलथे मॅडम आम्हाला म्हणाल्या, की तुम्हाला माझी शपथ आहे, घरी हा प्रकार सांगू नका.

त्यांनतर धुपेकर सरांची दुसर्‍या शाळेत बदली झाली. तसेच आमच्या शाळेतील गभाले मॅडम मला नेहमी मुलांच्या नावाने चिडवून त्रास देत असत. आम्ही तेदेखील घरी सांगितले नाही.

मी इयत्ता 9 वीमध्ये असताना जेव्हा जेव्हा शाळेच्या आवारात तसेच होस्टेलमध्ये फिरत असे, तेव्हा शाळेतील साफसफाई कामगार धांडे मामा (पूर्ण नाव माहीत नाही) आमचा पाठलाग करायचे व कपडे धूत असतानादेखील आमच्याजवळ उभे राहायचे. असे प्रकार सारखेच सुरू झाल्याने आम्ही पुन्हा मुख्याध्यापिका कुलथे मॅडम यांना सांगितले. मात्र या वेळी, झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली. हा प्रकारही घरचे मलाच बोलतील या भीतीमुळे घरी सांगितला नाही. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत धांडे मामा यांचीदेखील बदली झाली.

Ahilyanagar
Rahuri News: ‘त्या’ दीड कोटीचे राहुरी कनेक्शन; पोलिस अधिकार्‍यांची चौकशी सुरू

मी इयत्ता दहावीला गेल्यानंतर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम मला सतत कोणत्या न कोणत्या कारणावरून बोलू लागल्या व मानसिक त्रास देऊ लागल्या. दि.21 जुलै 2025 रोजी शाळेत असताना मला मॅडम परत बोलल्यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला. तो त्रास सहन न झाल्याने मी आमच्या आश्रमशाळेतील मोबाईल फोनवरून माझ्या आई-वडिलांना दोन वर्षांपासून घडलेल्या सर्व घटना सांगितल्या.

या मुलीच्या फिर्यादीवरून अकोले पोलिस ठाण्यात शिक्षक भाऊराव राया धुपेकर, उत्तम राजाराम धांडे, संगीता कुलथे, शैभा बाळू गभाले यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मोहन बोरसे तपास करीत आहे.

आश्रमशाळेत चौकशीसाठी विशाखा समिती

शासकीय आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींची शिक्षकाने छेडछाड करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल होताच आमदार डॉ. किरण लहामटे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी आश्रमशाळेला भेट दिली. पीडितेची भेट घेऊन तिच्या पालकांशी चर्चा करून त्यांना आधार दिला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन आ. लहामटे यांनी दिले. याबाबत चौकशीसाठी विशाखा समितीची नेमणूक केल्याचे बोकडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news