Parner Crime Pudhari
अहिल्यानगर

Parner Crime: पारनेर खून व जबरी चोरी प्रकरणाचा 24 तासांत छडा; आरोपी अटक, 10.84 लाख जप्त

भांडगाव येथे खून करून रोकड व दागिने लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले; मोठा मुद्देमाल जप्त करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

नगर: भांडगाव (ता. पारनेर) येथे खुनासह जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने 24 तासात गजाआड केला. आरोपीकडून 10 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महेश हनुमंत खरमाळे (वय 45, रा. भुजवळवस्ती, भांडगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

पारनेर पोलिस ठाण्यात खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी सिध्देश संदीप खरमाळे (रा. भुजवळवस्ती, भांडगाव) यांच्या वडिलांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी करण्याचे उद्देशाने डोक्यात कोणेतरी हत्याराने मारहाण करून ठार मारुन घरातील 12 लाख 70 हजारांची रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले होते.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणणे कामी सूचना केल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या यांनी तपासाकामी पथक रवाना केले.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना माहिती मिळाली की वरील गुन्हा महेश खरमाळे याने केला असून, तो भांडगाव ते जामगाव रस्त्याने दुचाकीवर दोन बॉक्स पाठीमागे बांधून घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिस पथकाने भांडगाव ते जामगाव रस्त्यावर सापळा लावून त्याला पकडले. त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले.

त्याच्याकडे विचारपूस केली असता तो म्हणाला, 15 मे 2026 रोजी पहाटे मी माझे पुतण्या संदीप भास्कर खरमाळे यास त्याचे राहते घरी जावुन हातोड्याने डोक्यात वार करून ठार मारले. त्याच्या घरातील रोख रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 10 लाख 29 हजारांची रोकड, एक मोबाईल, दुचाकी असा एकूण 10 ला 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT