पावसाचे पाणी पायावर उडाल्याने एकास चार जणांकडून बेदम मारहाण  File Photo
अहिल्यानगर

Jamkhed News: पावसाचे पाणी पायावर उडाल्याने एकास चार जणांकडून बेदम मारहाण

पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

जामखेड- मेसचे डब्बे देण्यासाठी रस्त्याने मोटारसायकल वरून जात असताना रस्त्याचे पाणी एका जणांच्या पायावर उडाले. या कारणावरून चार जणांनी दुचाकीस्वाराला लोखंडी रॉडने मारहान केली. दुचाकीस्वाराचा हात फॅक्चर झाला. पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड पोलीसात भूषण मेनकुदळे (रा. सदाफुले वस्ती जामखेड) यांनी फिर्याद दिली की, शुक्रवार दुपारी एक वाजता मेसचे डब्बे देणेसाठी मोटारसायकल वरुन घरी जात असताना डॉ. धुमाळ यांच्या जुन्या दवाखाण्यासमोर रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल यामुळे दुचाकी हळु चालवत होतो. त्यावेळी समारुन हुजेब अन्वर कुरेशी हा त्याच्या मोटारसायकल वरुन येत होता. (Ahilyanagar News Update)

त्यावेळी माझे मोटारसायकालचे टायरचे पाणी त्याचे पायावार उडाले व मी घरासमोर पोहचलो त्यावेळी तो माझे पाठीमागे हुजेब कुरेशी आला व पाणी का उडवले अशी विचारणा केली असता त्यास रोडवर पाणी साचल्याने चुकून पाणी उडाले व सॉरी बोललो यावेळी आईने हुजेब कुरेशी यास समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने आईला शिवीगाळ केली व बघतो तुमच्याकडे म्हणून निघून गेला.

शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता मेसचे डब्बे घेऊन दुचाकीने जात असताना महाजन सर यांचे घराचे समोर हुजेब कुरेशी, आयान सय्यद, मारुफ शेख, आफनान कुरेशी (सर्व रा. सदाफुले वस्ती जामखेड) व इतर दोन अनोळखी इसमानी दुचाकी आडवली त्यावेळी हुजेब अन्वर कुरेशी याने त्याच्या हातातील लोंखडी रॉडने मला मारण्यास सुरवात केली.

मी गाडी सोडून पळून जात आसताना हुजेब ने मला पकडले व खाली पाडून माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या साथीदाराने लोंखडी रॉडने हतावर, पायावर मांडीवर मारले.

माझ्या ओळखीचे रमेश वराट हे तेथे आले त्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सोडविले. जाताना त्यांनी आमच्या नादी लागला तर तुला जीवंत सोडणार नाही असा दम दिला. त्यानंतर ते तिथूननिघुन गेले. अशी फिर्याद भूषण मेनकुदळे यांनी दिल्यावरून पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT