

श्रीरामपूर: शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील फेमस मॉल व कॅफेसमोरील तब्बल अडिच वर्षे रखडलेल्या रस्त्याचा कामाचा अखेर श्रीगणेशा करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास निधीतून या रस्त्याचे काम सुरु होणार आहे.
शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रख्यात उद्योजक व आर्किटेक-इंजिनिअर असोशियशनचे माजी अध्यक्ष- अभियंता के. के. आव्हाड यांनी भूषविले. फेमस बाजार- बोरावके नगर ते महानुभाव आश्रमपर्यंतच्या या रस्त्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (Ahilyanagar News Update)
माजी नगराध्यक्षा, श्रीसाई संस्थानच्या माजी विश्वस्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर, ज्येष्ठ उद्योजक आशिष बोरावके, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, मिस इंडिया स्पर्धेच्या विजेत्या शिल्पा आव्हाड व इंजिनिअर श्रद्धा आव्हाड आदींच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले.
मानाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, तथा नामदार राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले यांनी सोहळा आयोजित केला. रत्याचे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी नवले यांनी सतत पाठपुरावा केला, त्याचेच हे फलित आहे, अशा शब्दात उपस्थितांनी त्यांचा गौरव केला. दिनकर म्हणाले की, मंत्री विखे पाटील यांच्या विकास निधीतून रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. यावेळी मंगला दुशिंग, अरुण साळे, संजय दुशिंग, आदिक दोशी, बंडु शिंदे, डॉ. विजय त्रिभुवन, मनोज विश्वासे, अॅड. आदर्श दुशिंग, प्रमोद पतकी, दिलीप सगळगिळे, आदित्य आदिक, प्रा. अनिल बागुल, लेविन भोसले, पत्रकार दीपक कदम आदी उपस्थित होते. लेविन भोसले यांनी आभार मानले.