मांडओहळ प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढवा; नीलेश लंके यांचे शरद पवार यांना साकडे  Pudhari
अहिल्यानगर

Nilesh Lanke News: मांडओहळ प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढवा; नीलेश लंके यांचे शरद पवार यांना साकडे

दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते.

पुढारी वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांची जीवनरेखा ठरलेल्या मांडओहळ मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची 1 मीटरने वाढवावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्याकडे केली.

मांडओहळ मध्यम प्रकल्प हा पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्टयासाठी वरदान ठरला आहे. सध्या धरणाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 210 दशलक्ष घनफूट आहे. मात्र दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते. (Latest Ahilyanagar News)

खासदार लंके यांच्या मते, धरणाच्या सांडव्याची उंची केवळ 1 मीटरने वाढविली तर धरणाचा पाणीसाठा मोठया प्रमाणावर वाढेल. या वाढीमुळे पारनेर तालुक्याच्या जवळपास अर्ध्या भागात सिंचन वाढले जाईल. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही सुटू शकतो.

मांडओहळ प्रकल्पाची विद्यमान क्षमता अपुरी पडत असल्याने धरणाच्या सांडव्याची उंची वाढविणे अत्यावष्यक आहे. पवार यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रियेला गती द्यावी, अशी विनंती खा. लंके यांनी केली.

गोदावरी खोर्‍यावर परिणाम नाही

मांडओहळ प्रकल्प गोदावरी खोर्‍यांतर्गत येतो. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्याचीउंची वाढविण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनेकदा अडचणी येत आहेत. त्यावर खा. लंके यांनी स्पष्ट केले की, उंची वाढीमुळे गोदावरी खोर्‍याच्या जल हिशेबावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट, जलसाठा वाढल्याने स्थानिक लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT