पारनेर: जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एनएच 160 या महामार्गाच्या रुंदीकरण कामात प्रचंड दिरंगाई होत असून, या कामास सुरुवात करावी, या मागणीसाठी खा. नीलेश लंके शुक्रवार (दि. 11)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
सावळीविहीर ते अहमदनगर बायपास या 75 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणासाठी भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि., देहरादून या कंपनीला ठेका देण्यात आला असून, 21 मार्च 2025 रोजी ठेका करार पार पडला होता. (Latest Ahilyanagar News)
29 एप्रिल रोजी संबंधित कंपनीस काम मंजूर होऊनही आजअखेर कोणतेही काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. त्याविरोधात पत्रव्यवहार करण्यात येऊनही दखल न घेतल्याने खा. लंके यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे.
यापूर्वी आमदार असताना लंके यांनी नगर-पाथर्डी व नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनास अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.