Manish Ghadge Patil death Pudhari
अहिल्यानगर

Manish Ghadge Patil death: अखेर त्रिमूर्तीचे सचिव मनीष घाडगे यांचे निधन; शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त

त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातून मोठी हळळ व्यक्‍त केली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील यांचे शुक्रवार (दि.१) रोजी महाराष्ट्र दिनी पहाटेच्या सुमारास त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरु असताना निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातून मोठी हळळ व्यक्‍त केली जात आहे.

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगेपाटील यांनी मंगळवार (दि.२८) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संस्थेच्या सचिव कार्यालयात स्वतःला कोंडून घेत दोन्ही दरवाजे बंद करून ज्वलंत पदार्थाने जाळून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या घटनेमध्ये ते गंभीररित्या जखमी झालेले होते. त्यांच्यावर नगर येथील खासगी दवाखान्यात औषधोपचार सुरु असतानाच त्यांची शुक्रवारी प्राणज्योत मालवली. त्यांचा स्वभाव हा अत्यंत हसतमुख आणि शांत असल्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच तालुक्‍यात मोठी हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

त्रिमूर्ती शौक्षणिक संकुलात त्यांच्या निधनाचे वृत्त येताच संस्थेच्या अधिकारी कर्मचारी आणि शिक्षिकेत्तर कर्मचारी सुन्न झाले असून सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्येचा प्रयत्न कशामुळे केला याचे निश्चित कारण समजले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT