Pradhanmantri Awas Yojana in Ahilyanagar
जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत तालुक्यातील सर्वेक्षणात ग्रामसेवकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. बहुतांश ग्रामसेवकांनी जबाबदारी पार पाडली नसल्यानेे गरजूंचे घरकुलाचे स्वप्न स्वप्नच राहण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निष्क्रिय ग्रामसेवकांवर कारवाई होणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात अपात्र लाभार्थ्यांची संख्या 5213 एवढी आहे. सर्व अपात्र लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असताना फक्त 1564 एवढेच सर्वेक्षण केले. त्या उर्वरित अपात्र यांचे दोन दिवसात सर्वेक्षण होणार का? तस न झाल्यास अनेकांचे घरकुल लाभार्थी वंचित राहणार आहेत. (Ahilyanagar News Update )
जिल्हास्तरीय सर्वेक्षण अहवालानुसार तालुक्यात एकूण 4411 जणांचे सर्वेक्षण झाले. मात्र, 11 मेपर्यंत फक्त 2847 स्वयं सर्वेक्षण आणि 1564 सहायक सर्वेक्षण एवढाच कामकाज झाले. त्यामुळे अनेक गावातील लाभार्थी संख्या कमी असल्याचे दिसते. त्यामुळे याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक याला जबाबदार असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवित आहेत. प्रश्न फक्त आकडेवारीचा नसून लोकांच्या हक्कांचा आहे.
सरकार ‘घरकुल सर्वांना’चा नारा देत असताना, जिथे सर्वेच होत नाही, तिथे हक्काच्या घराचा स्वप्नवत प्रकल्प अपयशी ठरण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने घरकुलासाठी निधी दिला, यंत्रणेने योजना आणली, पण गावात ग्रामसेवकच येत नसल्याने गरीब काय करणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे .
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या रत्नापूर ग्रामपंचायतींने सहायक सर्वेमध्ये आघाडी घेतली आहे. यामध्ये तेथील ग्रामसेवकाने 500 पेक्षा जास्त घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी केली. जवळा येथील ग्रामपंचायती ने स्वयं सर्वेमध्ये बाजी मारत 330 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंद केली.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून निष्क्रिय ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गावांतील सर्वेक्षण आकडे 10 च्या खालीच आहेत. त्यामध्ये चोंडी 1, धनेगाव 2, जामखेड 2, जायभायवाडी 3, नाहुली 9, वाकी 9. याशिवाय अरणगाव 2, चोंडी 3, धामणगाव 4, धनेगाव 5. जायभायवाडी 6, जामखेड 7, खर्डा 8, मोहा 9, मोहरी 10, मुंजेवाडी 11, नाहुली, 12, साकत 13, शिऊर 13. गावच्या ग्रामसेवकांनी एकही सर्वे केला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.