Encroachment Removal Drive Pudhari
अहिल्यानगर

Encroachment Removal Drive: स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा; महापालिका व शहर वाहतूक शाखेची संयुक्त कारवाई

महापालिका आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत चहाच्या टपऱ्या, लोखंडी टेबल, फ्लेक्स बोर्ड आणि अनधिकृत खाद्यविक्रीच्या ठिकाणांवर कारवाई.

पुढारी वृत्तसेवा

नगर: महानगरपालिका व शहर वाहतूक शाखा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईअंतर्गत स्वस्तिक चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे अनधिकृत अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.

महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनाधिकृतपणे रस्ते व पदपथ अडवणाऱ्या विक्रेत्यांचे व व्यावसायिकांचे धाबे दणाणले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चहाच्या टपऱ्या, लोखंडी टेबल, फ्लेक्स बोर्ड, अनधिकृत नाष्ट्याच्या हॉटेलवर कारवाई करीत साहित्य जागेवरच जप्त केले.

त्यात हातगाडी : १, टपऱ्या : ४, लोखंडी टेबल : ७, फायबर टेबल : ८, फायबर खुर्च्या : ८, फ्लेक्स बोर्ड : ९, फायबर स्टॅच्यू : २ याचा समावेश आहे. शहरात दररोज दोन पथके रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करीत आहेत.

ही कारवाई अतिक्रमण विरोधी प्रथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, सुरेश इथापे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने केली.

शहरात वाहतुकीचा कोंडमारा टाळण्यासाठी व नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ते मोकळे राहण्यासाठी यापुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरूच राहील.
- आदित्य बल्लाळ, अतिक्रमण विरोधी प्रथक प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT