नेवासा: नेवासा शहरात गेल्या चार महिन्यांपासुन नळाला गढूळ पाणी येत असून, या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मातीमिश्रित पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे शहरवासीयांना शुद्ध विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
नेवासा नगरपंचायतीच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे पाणी समस्या कायमचा त्रास आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि चिखलयुक्त होत आहे. याचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांना पोटदुखी, गॅस, काविळ, चक्कर येणे यासारखी आजारांशी सामना करावा लागतो. (Latest Ahilyanagar News)
शहरवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी नियमित भरत असल्याने नागरिकांना वीज, पाणी, रस्ते यासह विविध सुविधा नगरपंचायत प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षीतपणाने शहरवासियांना पाण्याची समस्या कायमच भेडसावित आहे.
यावेळी संतप्त महिला कडून पाणीयोजनेच्या विभागला गढूळ पाणी भरलेल्या बॉटल देण्यात आल्या व आपल्या भावना मुख्य आधिकार्यांच्या दालनात मांडण्यात आल्या.
अधिकार्यांना दिले गढूळ पाणी
नळाला येणार्या गढूळ पाण्यासदर्भात समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांनी नगरपंचायत कार्यलयात जाऊन गढूळ पाण्याच्या बाटल्या संबंधितांना दाखविल्या. या बाबत सबंधित अधिकार्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महिला समवेत नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.