Sangram Jagtap pudhari
अहिल्यानगर

Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप यांना ‘दोन दिन के अंदर खत्म करूंगा’ अशी धमकी

अतिरिक्त पोलिस संरक्षणाची मागणी; राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ एसपींच्या भेटीला

पुढारी वृत्तसेवा

नगर : हिंदुत्वासाठी राज्यभर धाऊन जाणारे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना ‘दोन दिन के अंदर खत्म करूंगा’ अशी धमकी देण्यात आली आहे. आ. जगताप यांचे धर्मरक्षणाचे कार्य ‘जिहादी’ लोकांच्या डोळ्यात खुपत असून त्यांना अतिरिक्त संरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीसह हिंदू समाजाने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे.

धमकीमुळे आ. संग्राम जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धोका असून त्यांच्या संरक्षणाची जबाबादरी पोलिस प्रशासनाची असून धमकी देणार्‍यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, सागर बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, महिला आघाडीच्या अशा निंबाळकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, रेश्मा आठरे, साधना बोरुडे, मयूर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कांबळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, निलेश बांगरे व सुरेश शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, हिंदू समाजाने कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदू मंदिरांच्या रक्षणासाठी व दोन धर्मांतील वादविवाद असलेल्या ठिकाणी आ. जगताप हे मोर्चात सहभागी होत सभा घेत आहेत. त्यासाठी ते राज्यभर जातात. त्यांच्या धर्मरक्षणाचे कार्य ‘जिहादी’ लोकांना खुपत असल्याने त्यांनी आ. जगताप यांना टार्गेट केल्याचे दिसते. प्रसारमाध्यमांवर ‘जिहादी’ त्यांच्या धर्माच्या बाजूने आणि आ. संग्राम जगताप यांच्या विरोधात जाणीवपूर्वक चितावणीखोर वक्तव्ये करत आहेत. आ. संग्राम जगताप यांना गर्दीतून गोळी मारू असे धमकीचे वक्तव्य केले जात आहे. हे पाहता आ. जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला ‘जिहादी’पासून धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या घातपाताची भीती व्यक्त करताना त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षणाची मागणी शिष्टमंडळाने केली.

स्वीय सहायकाच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज

आ. संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर आ. जगताप यांना धमकी देणारा टेक्स्ट मेजेस पाठविण्यात आला आहे. ‘दोन दिन के अंदर खत्म करूंगा’ अशी धमकी देणार्‍याचा पोलिसांनी शोध घेऊन तातडीने कठोर कारवाई करावी. धमकी देणार्‍यामागील मास्टर माइंड कोण? याचाही शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

‘ते’ अजूनही अहमदनगरच म्हणतात!

नगरचे नामांतर आता अहिल्यानगर झाले आहे. मात्र हे ‘जिहादी’ लोक अद्यापही सर्वत्र अहमदनगरच नाव वापरत आहेत. त्यांना संविधान मंजूर नसल्याचे यातून दिसत आहे. अहमदनगर नाव असताना सर्व हिंदू तेच नाव वापरत असे. आता नामांतर झाले पण ‘जिहादी’ अजूनही अहिल्यानगर न म्हणता अहमदनगर शब्दप्रयोग करत आहेत. शिष्टमंडळाच्या भावना पाहता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधितांचा शोध घेऊन कारवाईचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT