Shrirampur Crime Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Crime: श्रीरामपुरातून ९६ हजारांचे मेफेड्रोन जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकास अटक

अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नगर: श्रीरामपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापेमारी करून एम. डी. अंमली पदार्थ तस्कराला अटक केली. त्याच्याकडून २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोहेल जुबेर शेख (वय २७, रा.मिल्लतनगर, श्रीरामपूर) असे अटक आरोपीचे नाव असून, असीफ मुनीर शेख (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर पसार आरोपीचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्ती माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.

त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार, अतुल लोटके, बिरप्पा करमल, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, रमिजराजा आतार, विशाल तनपुरे, चालक भगवान धुळे यांना रवाना केले.

पोलिस पथक श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाल की, सोहेल जुबेर शेख हा एम. डी. अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने श्रीरामपूर ते संगमनेर रस्त्यावरील नांदूर शिवार अस्तगाव फाटा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

त्याने सोहेल शेख असे नाव सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता ९६ हजार ६०० रुपयांचा 4.83 मिली ग्रॅम वजनाचा एम.डी.(मेफेड्रोन) अंमली पदार्थ, ६ हजार २०० रोख, ५० हजारांचा मोबाईल व एक लाखांची दुचाकी असा २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्याने अंमली पदार्थ एम.डी. कोठून आणले याबाबत विचारणा केली असता असीफ मुनीर शेख याच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT