Malgangadevi Yatra Pudhari
अहिल्यानगर

Malgangadevi Yatra: 85 फूट उंचीच्या काठीची मिरवणूक; मळगंगा देवीच्या जयजयकाराने निघोज परिसरात दुमदुमला

पावसाची शक्यता निर्माण झाल्याने काठीची मिरवणूक नेहमीपेक्षा एक तास आधीच काढण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

निघोज: तब्बल 85 फूट उंचीच्या सजवलेल्या काठीची गुरुवारी (दि.2) दुपारी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी भंडाऱ्यांची उधळण करीत मळगंगा देवीच्या जयजयकाराने निघोज परिसर दुमदुमून टाकला.

दुपारी एक वाजता आकाशात ढग दाटून आले. विजतांचा कडकडाट सुरू झाला. पावसाची शक्यता निर्माण झाल्याने काठीची मिरवणूक नेहमीपेक्षा एक तास आधीच काढण्यात आली. मात्र, रिमरिम पाऊस सुरूच झाला. असे असूनही काठी मिरवणुकीला भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

देवीला हळद लावणे, काठीची मिरवणूक यानंतर शुक्रवारी (दि.10) मुख्य यात्रा सुरु होत आहे. ही यात्रा तीन दिवस सुरू असते. राज्यभरातून लाखो भाविक यात्रेसाठी येतात. रोज सकाळी सहा वाजता, सायंकाळी सात वाजता देवीची महाआरती होते. पुजारी म्हणून गायखे कुटुंबीय सेवा करते. आरतीला संबळ वाजविण्याचा व आरतीचा मान दुणगुले कुटुंबाला आहे.

देवीची हेमांडपंथी बारव ते मळगंगा मंदिरापर्यंत काठी नेण्यासाठी व काठी उचलण्याचे कसब पणाला लावून काठी उचलली जाते. चारही बाजूंनी दोराने काठीचा तोल सांभाळूनच मिरवणूक काढली जाते. वजनदार काठी व उंची 85 फूट या काठीची मिरवणूक ही देवीचा एक साक्षात्कार मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT