Money Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Loan Collection Fraud: कर्ज वसुलीतील 3.51 लाखांचा अपहार; श्रीरामपूरमध्ये फायनान्स कर्मचाऱ्यावर गुन्हा

कर्जदारांकडून वसुल केलेली रक्कम कंपनी खात्यात न भरता खिशात घातल्याचा आरोप; बनावट पावत्या देऊन फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: ऑनलाईन वितरीत कर्जाची वसुली कर्जदाराकडून केली खरी मात्र ती कंपनी खात्यात न भरता खिशात घालणाऱ्या वसुली कर्मचाऱ्यांविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने 3 लाख 51 हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले.

पवन वाल्मिक डोंगरे (रा.शिरसगाव,श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पवन एल ॲन्ड टी फायनान्स कंपनीमध्ये फील्ड लोन कलेक्टर म्हणून काम करत होता. श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील कर्जदारांकडून कर्जाची रक्कम वसूल करून ती कंपनीच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात जमा करण्याची जबाबदारी कंपनीच्या त्याच्याकडे दिली होती. कंपनीच्या अंतर्गत तपासणीत काही कर्जदारांच्या खात्यात भरलेली रक्कम जमा झालेली नसल्याचे आढळून आले. यानंतर चौकशी ककरता, संबंधित कर्जदारांकडून रक्कम वसूल करून ती कंपनीच्या खात्यात जमा न करता डोंगरेने स्वतःकडे ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला.

17 जुलै 2023 ते 3 जानेवारी 2024 या कालावधीत सुमारे 3 लाख 51 हजार रुपये पवन वाल्मीक डोंगरे याने कर्जदाराकडून वसुल केले. पण ते कंपनी बँकेच्या खात्यात भरलेच नाही. वसुल केलेल्या कर्जदारांना त्याने बनावट पावत्या देत अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीचे एरिया कलेक्शन मॅनेजर आसिफ अकबर बागवान यांनी फिर्याद दिली. पवन डोंगरे विरोधात विश्वासघात व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT