Kopargaon Beef Seizure Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Beef Seizure: कोपरगावात दोन कंटेनरमधून 18 टन गोमांस जप्त; दोघांना अटक

नगर-मनमाड महामार्गावरील कारवाईत 50.60 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव: गोवंश हत्या बंदी असतानाही गोमांस वाहतूक करणाऱ्या सराईत टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन कंटेनरमधून 18 टन गोमांस जप्त करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी दि. 28 मे रोजी नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली सापळा रचला होता. संशयास्पद हालचाली असणारे दोन कंटेनर पोलिसांनी थांबवून तपासणी केली. कंटेनरमध्ये गोमांस असल्याचे उघड झाले.

एका कंटेनरमध्ये तब्बल 12 टन, तर दुसऱ्यामध्ये 6 टन असे एकूण 18 टन गोमांस आढळून आले. त्याची अंदाजे किंमत 12 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दोन्ही कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमे 18 लाख व 20 लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल 50 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी राजकुमार श्यामलाल यादव (वय 33) व प्रतापसिंग श्रीदलवीर सिंग (दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली असून ते कंटेनर चालक असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, उपनिरीक्षक संदीप सोन्ने व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT