Omprakash Koyate Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Municipal Election NCP: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय ऐतिहासिक ठरेल – ओमप्रकाश कोयटे

विरोधकांच्या धोरणांमुळे असंतोष; विकासाच्या मुद्यावर कोपरगावकर राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करतील

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव नक्की आहे. जर निवडणूक मागील निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 30 तारखेला झाली असती, तरी विजय हा राष्ट्रवादीचाच होणार होता. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निवडणूक लांबली आहे त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांबरोबरच त्यांचे उमेदवार आणि कोपरगावकरांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे 21 तारखेला राष्ट्रवादीचा होणारा विजय हा ऐतिहासिक असणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काकासाहेव कोयटे यांनी केली.

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचार प्रसंगी कोपरगाव शहरातील घोंगडी बैठकी दरम्यान कोयटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोयटे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषद द्यायचे हे कोपरगावकरांचे ठरले आहे.

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराचा 40 वर्षाचा पाणी प्रश्न सोडविला आहे आणि कोपरगाव शहराचा अपेक्षित विकास देखील केला असून त्यांचे विकासाचे व्हिजन कोपरगाव शहराला निश्चितपणे राज्यात नंबर एकवर घेवून जाणार आहे. त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कोपरगावचे सुजाण मतदार विकासाला आडवे येणाऱ्यांना कधीच निवडून देणार नाही हि काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे.

निवडणूक हातातून सुटत चालल्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्यासाठी समता पतसंस्थेच्या बाबतीत विरोधकांची सुरु असलेले पडद्यामागचे खालच्या पातळीवरचे राजकारण कोपरगावकरांनी ओळखले आहे. कोपरगावच्या जुन्या जाणत्या ज्या ज्येष्ठ नेत्यांनी कोपरगावचा आदर्श सहकार जपला आहे ज्याचे उदाहरण राज्याच्या राजकारणात दिले जाते. परंतु निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळे एकाही निवडणुकीत निवडून न आलेल्या अविचारी नेत्याने सहकाराला नख लावण्याचा केलेला प्रयत्न कोपरगावचे सुज्ञ मतदार कधीही खपवून घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कोयटे यांनी यावेळी व्यक्त केला.

‌‘समता‌’च्या ठेवी वाढत्याचः कोयटे

समता हि ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासावर चालते. त्यामुळे विरोधकांनी कितीही गैरसमज पसरविले तरी समताच्या ठेवी वाढतच आहेत. त्यामुळे विरोधकांचे कोणतेच डावपेच त्यांना होणाऱ्या पराभवापासून वाचवू शकणार नाहीत. जरी ते सहकारी संस्थांच्या बाबतीत खोटा कळवळा दाखवत असले तरी मी त्यांच्या सोबत राहिलो आहे. मला त्यांचा अगदी जवळून अनुभव आहे, अशीही टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT