कोल्हारला देवीचे गाभारा दर्शन Pudhari
अहिल्यानगर

Kolhar: कोल्हारला देवीचे गाभारा दर्शन बंद ; पिशवी, लेसर शोलाही बंदी

नवरात्रोत्सवात पारंपरिक वाद्य वाजवा ः डॉ. खर्डे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हारः नवरात्रोत्सव काळात डिजेसह लेसर शोऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावित, असे आवाहन कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे खजिनदार, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे यांनी केले आहे. माळीच्या कार्यक्रमात कर्णकर्कश डीजेसह लेजर शो वापरू नये, या संदर्भात डीजे मालकांना सूचना देण्यात येणार आहेत. देविच्या मंदिरात प्लास्टिक पिशवी आणू नये. प्लास्टिक पिशवीला बंदी आहे. प्लास्टिक पिशवी आणणार्‍या भाविकाला प्रवेशद्वारावर अडविले जाईल. असे ते म्हणाले.

श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे येत्या 22 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या श्रीभगवती मातेच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्तांसह ग्रामस्थांच्या बैठकीत डॉ. खर्डे बोलत होते.

यावेळी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, सचिव संपत कापसे, विश्वस्त संभाजीराव देवकर, सर्जेराव खर्डे, नानासाहेब कडसकर, वसंत खर्डे, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, बी. के. खर्डे, दिलीप खांदे, ऋषिकेश खांदे, मधुकर खर्डे, विजय खर्डे, श्रीकांत खर्डे, वसंतराव मोरे, देवालय ट्रस्टचे व्यवस्थापक प्रवीण बेंद्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. खर्डे म्हणाले की, पार्किंग व्यवस्था मोफत असणार आहे. श्रीभगवतीमातेचे दर्शन सुलभ घेता यावे, यासाठी भाविकांना मंदिर गाभार्‍यात जाता येणार नाही, असे ते म्हणाले.

देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे म्हणाले की, नवरात्रोत्सव काळात 9 दिवस कीर्तन होणार आहेत. होमच्या आदल्या दिवशी कीर्तन होणार आहे. मंदिरात दररोज दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नवरात्रोत्सव काळात पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर असणार आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवालय ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT