ACB Bribe Case Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed ACB Bribery Case: जामखेड नगरपरिषदेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व कंत्राटी मदतनीस एसीबीच्या जाळ्यात

जन्मदाखल्यासाठी 3 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; एसीबीची जामखेडमध्ये कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: जन्मदाखला देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना जामखेड नगरपरिषदेचा लिपिक व कंत्राटी मदतनीसला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 6) करण्यात आली.

याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जन्म-मृत्यू नोंदणी लिपिक अभिजीत जालिम भैसडे (वय 39), अहमद इलियास शेख (वय 43, मदतनीस, अग्निशामक दल - कंत्राटी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदाराने मुलगा व मुलीच्या जन्मदाखल्यासाठी जामखेड नगरपरिषदेत अर्ज केला होता. त्यानंतर संबंधित दाखले मिळवून देण्यासाठी भैसडे यांनी शेख यांच्याकडे संपर्क करण्यास सांगितले. शेख यांनी प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे दोन दाखल्यांसाठी 3000 रुपयांची लाच मागितली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करण्यासाठी बुधवारी सापळा लावला होता. जामखेड नगरपरिषदेसमोर पंचासमक्ष शेख यांनी तक्रारदाराकडून 3000 रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. भैसडे यांनीही लाच स्वीकारण्यास संमती देऊन शेख यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांच्या पथकाने पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT