नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर आठ ठिकाणावर छापा टाकून तीन लाख 84 हजार 503 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 23 जानेवारी करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, गणेश लबडे, बिरप्पा करमल, दिपक घाटकर, राहुल डोके, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा आत्तार, भगवान थोरात, विशाल तनपुरे, सतिष भवर, सुनील मालणकर, अमोल कोतकर, मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार, सुवर्णा गोडसे, ज्योती शिंदे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले.
23 जानेवारी रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू, अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांची माहिती काढून श्रीगोंदा, कोपरगाव परिसरात छापे घातले. श्रीरामपूर शहरात छापा घालून लुकमान अमजद पठाण (वय 24, रा. वार्ड नं.2 बजरंग चौक, श्रीरामपूर) सलमान रशीद पठाण (वय 28 रा. मिल्लतनगर), सुरक्षा संतोष जाधव (रा. सरस्वती कॉलनी, देवकरवस्ती, वार्ड नं.7 श्रीरामपूर), मथुराबाई रावसाहेब गायकवाड (रा. वडारवाडा, वार्ड नं. 1 गोंधवणी, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले.
तर, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे घालून नितीन शिवराज शिंगाणे (वय 21, रा. कृष्णानगर धारणगाव रोड, ता. कोपरगाव), अलका दशरथ दांडेकर (रा. धामोरी, ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.
राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे घालून अंकुश खंडू ढाकणे (वय 30, रा. चिंचाळे, ता. राहुरी जि. अहिल्यानगर), भाऊराव लहानू पवार (रा. चिंचाळे ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे घालून दादासाहेब महादेव डोके (वय 44, रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.