संगमनेर शहर: प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे यांनी दिला आहे.
पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमातील हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. ठाकरे यांच्या आदेशानुसार हे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्वच शाळेच्या मुख्यध्यापकांना पोहोचवण्यात आले. या पार्श्वभूमीवर लोंढे यांनी हा इशारा दिला. (Latest Ahilyanagar News)
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष राहुल पानसरे, मनविसे तालुकाध्यक्ष महेश शिंदे, शहराध्यक्ष अविनाश शहा,मनसे उप तालुकाध्यक्ष सुरज तळेकर, बजरंग घुले, सतीश पावसे, विभाग अध्यक्ष अभिनाथ शिंदे, संजय शिंदे, रोहण गुंजाळ, आकाश शिंदे गौतम पवार, चेतन केंगार यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.