बोधेगाव: शेवगाव व पाथर्डी तालुक्यात वादळामुळे नागरिकांच्या घरांचे, मालमत्तेचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून तत्काळ मदत करण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी तहसीलदारासंह अधिकार्यांना दिल्या.
बुधवारी (दि. 11) शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत वादळासह झालेल्या पावसाने बहुतांशी ठिकाणी शेतकर्यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले, या वादळात अंगावर झाड पडल्याने दहिफळ येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.(Latest Ahilyanagar News)
महावितरणने विजेचे खांब, रोहित्राची त्वरित दुरूस्ती करावी. शेतकर्यांच्या पिकाचेही नुकसान झाले असून, विशेषत: केळीचे मोठे नुकसान नुकसान झाले. यासंदर्भात नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे करावेत. नुकसान भरपाई तत्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी आमदार राजळे यांनी दिल्या.
शेवगांव तालुक्यातील दहिगांव-ने, रांजणी, भावीनिमगाव, मठाचीवाडी, शहरटाकळी, मजलेशहर, भायगाव या गावांची नुकसानीची पाहणी आमदार राजळे यांनी केली. यावेळी प्रभारी तहसीलदार दीपक कारखेले, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, महा वितरणचे अभियंता दिवेकर, संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.डी. कोल्हे, संदीप खरड, ताराचंद लोढे, कल्याण जगदाळे, अनिल सुपेकर, रामा मुंगसे, लक्ष्मण काशिद, बशीर पठाण, आसाराम नर्हे, शरद थोटे, आप्पासाहेब सुकासे, मोहनराव लोढे, नवनाथ फासाटे, संतोष आढाव, सुरेश बडे, अशोकराव देशपांडे आदी उपस्थित होते.