Ashadi Wari Special Railway
श्रीरामपूर: पंढरपूर येथे 6 जुलैला आषाढी वारी निमित्त यात्रा भरणार आहे. पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त वारकर्यांसाठी 4 विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. या रेल्वे जिल्ह्यातील कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर या तीन रेल्वे स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दि. 6 जुलैला पंढरपूरची आषाढी यात्रा आहे. मध्य रेल्वेचा नागपूर विभाग नागपूर आणि मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या (01205/01206) चालवणार आहे. या गाड्या ट्रेन ऑन डिमांड (टीओडी) योजनेअंतर्गत 1.3 भाडे योजनेअंतर्गत धावतील. (Latest Ahilyanagar News)
ट्रेन क्रमांक 01205 (नागपूर-मिरज विशेष) 4 जुलै आणि 5 जुलैला सकाळी 8:50 वाजता नागपूर स्थानकावरून निघेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11:55 वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
01206 (मिरज-नागपूर स्पेशल) मिरजहून दि. 6 आणि दि. 7 जुलैला दुपारी 12:25 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 12:55 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, मूर्तिजापूर, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, कवठेमहांकाळ, सलगर आणि अर्ग स्थानकांवर थांबतील.
10 स्लीपर क्लास, 4 जनरल क्लास, 2 थर्ड क्लास एसी, 2 गार्ड कम लगेज कोच (एसएलआरडी) एकूण 18 कोच राहणार आहेत, अशीही माहिती देण्यात आली.