नेवासा: नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारातील कांदा मार्केटमध्ये उन्हाळी गावरान कांद्याचे भाव पुन्हा घसरले आहेत. एक नंबर प्रतीचा कांद्याला केवळ 1300 रुपये क्विंटलप्रमाणे भाव लिलावात निघाले. कांद्याचे निच्चांकी दराचा फटका बसला असून, शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवतोय, अशी परिस्थिती निर्माण झाले आहे.
घोडेगाव उपबाजारात लिलावासाठी कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे. घोडेगाव हे कांद्याच्या लिलावासाठी मध्यवर्ती व योग्य दर मिळणारे ठिकाण असल्याने राहुरी, नेवासा ,गंगापूर ,पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका आधी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात कांदा येथे लिलावसाठी येत आहेत. (Latest Ahilyanagar News)
गेल्या दोन तीन-महिन्यांपासून कांद्याचे भावाचे चढ- उतार पाहता शेतकऱ्यांची भाव वाढण्याची प्रतीक्षा आता संपल्यात जमा असून, साठवलेला कांदा शेतकरी बाहेर काढत आहेत. दोन हजार रुपयाच्या कांदा पंधरा दिवसात बाराशे रुपयांपर्यंत आल्याने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. कांद्याचे दर सतत कोलमडल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. नाफेड खरेदी व केंद्र सरकारचा कांदा निर्यात धोरणावर शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.
घोडेगाव उपआवारात बुधवारी कांद्याचे लिलाव पार पडले. चांगल्या प्रतीच्या उन्हाळी गावरान कांद्याला 1100 ते 1200 रुपये भाव मिळाला. बुधवारी बाजार समितीत 270 वाहनांतून 48 हजार 223 गोण्यांची आवक झाली.
एक नंबर कांद्याला 1 हजार 300 रुपये ते 1400 रुपये, दोन नंबर कांद्याला 1200 रुपये ते 1150 रुपये, तीन नंबर कांद्याला 1 हजार रुपये, ते1 हजार 150 रुपये, गोलटा 800 ते 900 रुपये, गोल्टी 600 रुपये ते 700 रुपये, जोड हलका डॅमेज 200 ते 300 रुपये असे दर शेतकऱ्यांना मिळाले.
नवीन कांदा बाजारात येणार असल्याने उन्हाळी गावरान कांदा आणखीन खाली आला. नगदी पीक म्हणून अलीकडे कांद्याला महत्व प्राप्त झाले. उत्पादन खर्च कांद्याचे महागडे बियाणे, खत फवारणी खुरपणी मजुरांचे पैसे अधिकचा खर्च वाढल्याने कांद्यामध्ये चांगले दिवस प्राप्त होतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा साठविला होता.
पावसामुळे कांदा होतोय खराब
कांद्याचे तर आठवड्याला कोसळतआहेत. सध्या दमट हवामान व पावसाळ्यामुळे साठवलेला कांदा खराब होत आहे. कांद्याकडे पाहून शेतकऱ्याचे डोळ्यात पाणी येत असून कांदा अक्षरशः शेतकऱ्यांना रडवतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.