अकोले: अकोले हे तालुक्याचे ठिकाण, शहराची झपाट्याने वाढ होत असून, मध्यवस्तीतून कोल्हार - घोटी राज्यमार्ग गेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा निवासस्थाने, बसस्थानक, दुकाने, दवाखाने, विद्यालये व व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. या पार्शवभूमीवर अकोले नगरपंचायतीला अग्निशमन बंब मिळाला असला, तरी त्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्याची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, अग्निशमन वाहनावर प्रशिक्षित कर्मचार्यांची नेमणूक करण्यासाठी अकोले नगरपंचायत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसुन येत नाहीत.
शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. दी.7 मार्च 2015 मध्ये अकोले नगरपंचायत झाली. त्यानंतर 2023 पर्यंत येथे अग्निशमन दलाचा बंब नसल्याने एखादी आगीची घटना घडल्यास अकोले किंवा संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशमन बंबाचा सहारा घ्यावा लागत होता. अकोलेमध्ये वस्तीतून कोल्हार - घोटी राज्य मार्ग गेलेला असून, रस्त्याच्या दुतर्फा निवासस्थाने, बसस्थानक, दवाखाना व दुकाने, विद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे नगर पंचायतीला अग्निशमन दलाची नितांत गरज होती. अकोले नगर पंचायतीने शासनाकडे अग्निशमन बंबाचा व दलाचा प्रस्ताव सादर केला होता. तो शासनाकडे प्रलंबित होता. या पार्श्वभूमीवर मंत्री व आमदार, खासदाराची तत्कालिन नगराध्यक्ष, नगरसेवकांनी भेट घेऊन प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर शासन स्तरावरून प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळाली आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर नगर पंचायतीला नवीन परिपूर्ण अग्निशमन बंब वाहन 2023 मध्ये उपलब्ध झाले.
असे असले तरी अग्निशमन अधिकारी व कर्मचार्यांची पदे अद्यापपर्यंत रिक्त आहेत. त्यामुळे अकोले शहरासह राजूर, कोतुळ, समशेरपुर, देवठाण, भंडारदरा, कळस, ब्राह्मणवाडा, गणोरे परिसरात अग्नी ताडव सदृश्य घटना घडल्यास अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचवणारे वाहन चालकासह कर्मचारी नसल्याने नगरपंचायतीची मोठी तारांबळ उडत आहेत.
प्रशिक्षित कर्मचार्यांच्या नियुक्त्या करा
अकोले नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाची क्षमता 3000 हजार लिटर आहे.अकोले नगर पंचायतीला अग्निशमन वाहन 2024 मध्ये लोकार्पण केले. तर केमिकल फायबर, पेट्रोलियम फायर आदी सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
पण मात्र तालुक्यात आगीची कोणतीही घटना घडल्यास अग्निशमन बंबावर प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने नगरपंचायतीला तारेवरची कसरत करत तात्पुरते कर्मचार्यांना अग्निशमन बंबावर पाचारण करावे लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अकोले नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब वाहनावर प्रशिक्षित कर्मचार्यांची नेमणूक करणे गरजेचे आहेत.